👁 6 Views

अंबाजोगाईत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर अत्याचार

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

पंढरपूर Live 31 December 2017

अंबाजोगाईत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर अत्याचार : पिडीत तरूणी लातूर जिल्ह्यातील:शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 
निलेश चाळक बीड :  अविवाहित असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर अत्याचार केल्या प्रकरणी नाकलगाव (ता. माजलगाव) येथील राज उर्फ सिद्धेश्वर विटेकर याच्यावर शहर पोलीस ठाण्यात बलात्कार  कायद्याखाली शनिवारी गुन्हा नोंद झाला.

पीडित २२ वर्षीय तरुणी  लातूर जिल्ह्यातील आहे. ती  अंबाजोगाईत पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेत होती. याठिकाणी तिच्यासोबत प्रशिक्षण घेणाऱ्या एका तरुणाला भेटण्यासाठी त्याचा मावस भाऊ राज उर्फ सिद्धेश्वर विटेकर हा नेहमी येत असे. येथेच दोघांची ओळख होऊन त्याचे  रुपांतर प्रेमात झाले. ‘तू गर्भवती राहिल्याशिवाय माझ्या घरचे लग्नाला परवानगी देणार नाहीत’ असे सांगून राज विटेकरने तिला शेपवाडी येथील त्याच्या बहिणीच्या घरी नेऊन घरात कोणीच नसल्याची संधी साधत तिच्यावर अत्याचार  केला. त्यातून ही तरुणी गर्भवती राहिल्यानंतर  २७ जून २०१७ रोजी  त्याने नारळाच्या पाण्यातून काहीतरी दिल्याने तिचा गर्भपात केल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर त्रास होऊ लागल्याने राजने तिला माजलगाव येथील खाजगी रुग्णालयात नेऊन तिच्यावर उपचार केले. गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी पीडितेने नाकलगाव गाठून राजच्या आई वडिलांची भेट घेतली. परंतु, त्यांनी राजचे लग्न २०१० सालीच झाल्याचे सांगून राजसोबत तिचे लग्न लावण्यास नकार दिला. तरी देखील राजने पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्यासोबत लग्न करतो असे आश्वासन देऊन तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवले.

 परंतु, नंतर राजची मानसिकता लक्षात आल्याने पिडीतेने त्याच्यासोबत लग्न करण्यास स्वतःहून नकार दिला असता मी आपल्या दोघांचे आक्षेपार्ह्य अवस्थेतील फोटो सोशल मिडीयावर टाकून तुझी बदनामी करीन अशी धमकी देऊन त्याच्यासोबत संबंध ठेवले. दरम्यान,   २८ डिसेंबरला फोटो देण्याच्या बहाण्याने राजने तिलाअंबाजोगाईला आणले आणि लग्न का करत नाहीस म्हणून तिला मारहाण करून पुन्हा लातूरला सोडले. तिच्या वडिलांनाही शिवीगाळ केली. शनिवारी पीडित तरुणीने अंबाजोगाई शहर ठाणे गाठून   फिर्याद दिली. 
राज उर्फ सिद्धेश्वर विटेकर याच्यावर बलात्कार  कायद्यान्वये गुन्हा नोंद करुन त्यास अटक करण्यात आली. सहाय्यक पोलीस अधीक्षक विशाल आनंद तपास करत आहेत.
=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *