पंढरपूर LIVE 7 जानेवारी 2018
कृषी विकासाला चालना देणारा नाबार्डचा वित्त पुरवठा आराखडा
जिल्ह्याच्या कृषी विकासाला चालना देण्यासाठी नाबार्ड मार्फत संभाव्यतायुक्त वित्त पुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे.कृषी आणि कृषी क्षेत्राशी निगडीत क्षेत्रावर भर देणाऱ्या या वित्त पुरवठा आराखड्याच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास आहे.
§ रवींद्र राऊत, जिल्हा माहिती अधिकारी सोलापूर
ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्डची स्थापना करण्यात आली. कृषी आणि ग्रामीण भागाचा विकास ही या बँकेची मूळ उद्दीष्ट्ये ‘जल संरक्षण प्रति बूंद अधिक फसल’ असा या वर्षी बँकेचा संकल्प आहे. या संकल्पाला आधारभूत मानून सोलापूर जिल्ह्याचा 2018-19 साठीचा संभाव्यता युक्त पत पुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप झिले यांनी नुकताच या आराखड्याचे प्रकाशन केले आहे.
सोलापूर जिल्हा कृषी आणि कृषी उद्योगावर आधारित असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात कृषी आणि कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योग, सेवा उद्योग, निर्यात प्रधान उद्योगाचे जाळे आहे. कृषी आणि कृषी आधारित उद्योगाचे जाळे अधिक बळकट करण्यासाठी एकूण पतपुरवठा आराखड्याच्या सुमारे एक तृतीयांश पतपुरवठा या क्षेत्रासाठी राखून ठेवण्यात आला आहे.
लघु, लहान आणि मध्यम उद्योगाचा विकास व्हावा यासाठी हा आराखडा 9114.15 कोटी रूपयांचा आहे. या आराखड्यात 1764.05 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यात डाळींब, द्राक्षे, वस्त्रोद्योग उत्पादने निर्यात केली जातात. या निर्यात व्यवसायाला पतपुरवठा करावा यासाठी सुमारे पंचवीस कोटी रूपये तरतूद आहे. शिक्षणासाठी 116.64 कोटी रूपये तरतूद आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे या योजनेची पूर्तता व्हावी यासाठी या आराखड्यात भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये 474.94 कोटी रूपयांचा आराखडा आखण्यात आला आहे. ऊर्जा आणि पारंपारिक ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक होण्याची आवश्यकता आहे. कारण वीजेची वाढती मागणी आणि होणार पुरवठा यांचा ताळमेळ होण्याची गरज आहे. यासाठी ऊर्जा क्षेत्रात वाढीव गुंतवणूकीची आवश्यकता असते. म्हणून नवीनीकरणीय ऊर्जा क्षेत्रासाठी 16.84 कोटी रूपयांची तरतूद आहे. इतर क्षेत्रासाठी 236.60 कोटी रूपयांचा आराखडा आखण्यात आला आहे.
या आराखड्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि कौशल्यपूर्ण भारत यासारख्या भारत सरकारच्या महत्वपूर्ण योजनेशी संलग्न करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी या पतपुरवठा आराखड्यात दुग्धोत्पादन, कुक्कुट आणि मत्स्य व्यवसाय, फलोत्पादन, कृषीप्रक्रिया उद्योग यांच्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी कृषी आणि संलग्न उद्योगासाठी 6461.75 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या वित्त पुरवठा आराखड्यातून सोलापूरच्या विकासाला निश्चितच गती मिळेल, असा विश्वास नाबार्डचे जिल्हा प्रबंधक प्रदीप झिले यांनी व्यक्त केला.
कृषी आणि कृषी प्रक्रियावर आधारित विविध उद्योगांना या वित्त पुरवठा आराखड्याने निश्चित चालना मिळेल, असा विश्वास आहे.
संभाव्यता वित्त पुरवठा योजना आराखडा
|
अ.क्र.
|
क्षेत्र
|
वित्तीय तरतूद (रूपये लाखात)
|
|
1
|
कृषी आणि कृषी प्रक्रिया
|
646175.46
|
|
2
|
लघु, लहान आणि मध्यम उद्योग
|
176405.00
|
|
3
|
निर्यात प्रदान उद्योग
|
2405.00
|
|
4
|
शिक्षण
|
11664.00
|
|
5
|
गृहबांधणी
|
47494.80
|
|
6
|
नवीनीकरणीय ऊर्जा
|
1684.54
|
|
7
|
इतर क्षेत्रे
|
23660.50
|
|
8
|
सामाजिक सुरक्षा
|
1881.00
|
|
एकूण
|
911415.30
|
|
******
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
