पंढरपूर LIVE 7 जानेवारी 2018
पंढरपूर :-(प्रतिनिधी) येथील निषाद प्रकाशनच्या प्रकाशिका सौ. मनिषा कुलकर्णी यांना उत्कृष्ठ पुस्तक निर्मिती पुरस्कार.
मंगळवेढा येथील शब्दकळा साहित्य संघाच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त कविसंमेलन व साहित्य पुरस्कार वितरण समारंभ मारुती पटांगण मंगळवेढा येथे आयोजित केला होता या समारंभात पंढरपूर च्या निषाद प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या “इजांची मखमल” या गझल संग्रहास उत्कृष्ठ पुस्तक निर्मिती पुरस्कार बहाल करण्यात आला प्रकाशिका सौ. मनिषा कुलकर्णी यांच्या वतीने निषाद प्रकाशनचे संपादक कवी सचिन कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्विकारला या प्रसंगी मा. आमदार प्रणिती शिंदे, प्रणिता भगीरथ भालके मंगळवेढा न.प.च्या नगराध्यक्षा, कवी माधव पवार, प्रा.डॉ. महादेव देशमुख, प्रा.डॉ. वामन जाधव, विश्वविक्रमवीर कवी रवी सोनार, शब्दकळाचे अध्यक्ष शशिकांत जाधव तसेच इतर साहित्य क्षेत्रातील मान्यवर व रसिक उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com


