👁 8 Views

10 जानेवारी रोजी “महाराष्ट्र बंद” नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका. – मराठा क्रांती मोर्चा

पंढरपूर LIVE 8 जानेवारी 2018

10 जानेवारी रोजी “महाराष्ट्र बंद” नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका. – मराठा क्रांती मोर्चा


मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – मराठा समाज किंवा मराठा क्रांती मोर्चा तर्फे कुठलाही बंद नाही. १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीत एक मराठा भावाला आपला जीव गमवावा लागला तसेच २ जानेवारी रोजी प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या महाराष्ट्र बंद मध्ये अनेक ठिकाणी खाजगी मालमत्तेचे नुकसान केले गेले आहे व काही ठिकाणी मराठा बांधवांवर जाणीवपूर्वक ऍट्रॉसिटी सह इतर हि कलमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले गेले आहेत यांच्या निषेधार्त काही ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन विभागीय बंद ठेवण्यात आले असून “महाराष्ट्र बंद” बाबत असा कुठलाही निर्णय झालेला नाही आणि असा कुठलाही बंद ठेवला जाणार नाही. अशी माहित मराठा क्रांती मोर्चा समन्वयक विनोद पोखरकर यांनी दिली आहे.


पोखरकर म्हणाले की, मराठा समाजाच्या वतीने 10 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद अशा आशयाची एक पोस्ट मागील काही दिवसांपासून पासून सोशल मिडियावर धुमाकूळ घालीत आहे या संदर्भात मराठा क्रांति मोर्चा कडून असा कोणताही बंद नाही सदर पोस्टच्या माध्यमातून मराठा क्रांति मोर्चा सकल मराठा समाज यांच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे की, 10 जानेवारी ला कोणताही बंद नाही अफवावर विश्वास ठेवु नये मराठा क्रांति मोर्चा आणि सकल मराठा समाज हे समाजाचे व्यासपीठ आहे. ना कोणत्या पक्षाचे, ना कोणत्या संघटनेचे सकल मराठा समाज मराठा क्रांति मोर्चाची कोणतीही अधिकृत बैठक झालेली नाही आणि कोणीही मराठा सामाजाच्या नावावर मराठा क्रांति मोर्चा किंवा सकल मराठा समाजाने बंद पुकारलेला नाही. मराठा समाजातील तरूणांचा वापर करून राजकारण करून मराठा-दलित वाद लावू पाहणाऱ्यांच्या कटकारस्थानाला कोणीही बळी पडू नये. मराठा समाजाला या दंगलीत उतरवून मराठ्यांनाच टार्गेट करून जातीय तेढ निर्माण करून मराठ्यांची चळवळ मोडीत काढुन मराठ्यांचे लक्ष दूसरी कडे फिरवण्याचा प्रयत्न हानून पाडावा. मराठा समाजाला आपल्या मागण्यांकडे लक्ष देणे गरजेच आहे. दंगली पेक्षा आमच्या मुलांना आरक्षण, संरक्षण, शिक्षण, नोकरी, उद्योग, व्यवसाय या कडे लक्ष देणे गरजेच आहे तसेच कोणीही या अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगण्यात आलेले आहे. मराठा क्रांति मोर्चा व सकल मराठा समाजाचे नाव वापरून कोणी खोटे पोस्ट टाकत असेल या वर सर्व ग्रुप वर मैसेज टाकणाऱ्याला फोन करून जाब विचारावा असे पुढे म्हटले आहे. मराठा क्रांति मोर्चा आणि सकल मराठा क्रांति मोर्चाचे नाव घेऊन कोणत्याही पक्ष संघटनेने दिशाभूल करू नये. अन्यथा अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील याची नोंद घ्यावी असा इशारा मराठा क्रांति मोर्चा कडून देण्यात आलेला आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *