याबाबत पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना पुढील माहिती दिली. बघा व्हिडीओ…
पंढरपूर LIVE 9 जानेवारी 2018
आज जि.प. सदस्य गोपाळ अंकुशराव न्यायालयाला शरण आले. मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी न्यायालयात हजर व्हा..! असा आदेश दिल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार जि.प. सदस्य गोपाळ अंकुशराव हे स्वतःहून आज दि. 9 डिसेंबर 2017 रोजी न्यायालयाला शरण आले. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी.आर. देशमुख यांनी अंकुशराव यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
दि. 9 डिसेंबर 2017 रोजी पंढरीतील एकास सत्तुरने झालेल्या मारहाण प्रकरणी गोपाळ अंकुशराव यांच्या सांगण्यावरुनच ही मारहाण झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. सेशन व सुप्रिम कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. परंतु अद्याप त्यांना अटक झालेली नव्हती.
दि. 9 डिसेंबर 2017 रोजी दु. 12 वा. 45 वा. पंढरीतील शशिकांत हरी मुळे रा. कराड नाका यांना गाळे खाली करण्याच्या कारणावरून सत्तुरने मारहाण झाली होती. मारहाण करणारे श्रीकांत विठ्ठल कोलार व फिरोज ईस्माईल शेख या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. माझ्यावरचा हल्ला हा जि.प. सदस्य गोपाळ अंकुशराव यांचे सांगण्यावरून झाल्याचा आरोप फिर्यादी शशिकांत मुळे यांनी केला होता. तेंव्हापासून पोलिस गोपाळ अंकुशराव यांचा शोध घेत होते. दरम्यान गोपाळ अंकुशराव यांनी अटकपूर्व जामिनासाठी विविध कोर्टाकडे अर्ज केले होते. परंतु सेशन कोर्ट व सुप्रीम कोर्टानेही त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत कोर्टात हजर होवून तपासयंत्रणेला सहकार्य करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाच्या आदेशानुसार गोपाळ अंकुशराव हे आज दि. 9 जानेवारी रोजी स्वत:हून न्यायालयास शरण आले आहेत.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com

