👁 7 Views

अर्ध्या बीडमधील इंटरनेटसेवा बंद; व्यावसायीकांचे मोठे नुकसान


पंढरपूर LIVE 9 जानेवारी 2018
निलेश चाळक बीड :शहरातील सुभाष रोडच्या रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम करण्यापूर्वी बीएसएनएल व नगर पालिका यांच्या समन्वयाने रस्त्याच्या भूमीगत इंटरनेट सह इतर केबल ची व्यवस्था करणे आवश्यक होते. मात्र संबंधीत गुत्तेदारांनी रस्त्याचे काम करताना लक्ष न दिल्याने सुभाष रोडवरील भमीगत इंटरनेट वायर तुटले. मागील दोन दिवसापासून अर्ध्या बीड शहरातील इंटरने सेवा बंद असल्याने व्यावसायीकांचे मोठे नुकसान होत आहे. 
याबाबत बीएसएनएल च्या अधिकाºयांशाी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सुभाष रोडवरील रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी इंटरनेट वायर बाबत संबंधीत गुत्तेदारांना कळवले होते. एवढेच नाही तर प्रत्यक्ष काम सुरू असताना देखील याबाबत कल्पना दिली होती. असे असताना देखील इंटरनेट केबल कडे गुत्तेदारांकडून दुर्लक्ष झाल्याचे अधिकाºयांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे सुभाष रोड, भाजी मंडई तसेच सहयोग नगर भागात बँक, दैनिकांची कार्यालय व इतर व्यावसाईकांची दुकाने आहेत. अशा स्थितीत इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. या प्रकाराकडे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी लक्ष देऊन इंटरनेट सेवा सुरळीत करण्याच्या सुचना द्याव्यात अशी मागणी व्यापाºयांनी केली आहे.
सात दिवस लागणार सेवा सुरळीत होण्यासाठी 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बंद असलेली इंटरनेट सेवा सुरळीत होण्यासाठी अजून सात दिवसाचा अवधी लागणार असल्याने व्यापाºयांचे मोठे नुकसान होणार आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *