👁 12 Views

सोलापूर जिल्ह्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करणार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची माहिती

पंढरपूर LIVE 10 जानेवारी 2018
सोलापूर जिल्ह्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करणार
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची माहिती
         सोलापूर दि. 10 – सोलापूर जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने व्हिजन डॉक्युमेंट तयार करणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
           ‘सिध्दी 2017 आणि संकल्प 2018’ या अभियानाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे उपस्थित होते.
           डॉ. भोसले यांनी यावेळी जिल्ह्यात सुरु असलेली विकासकामे सध्या झालेली कामे, सध्या झालेली कामे आणि आगामी वर्षाचे संकल्प अशा विविध मुद्दयांवर पत्रकारांशी संवाद साधला.
           जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व विभागांची एकत्रित येवून विकास होण्याची खूप आवश्यकता आहे. त्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट फार उपयोग होईल.
           या डॉक्युमेंटमध्ये जिल्ह्यातील जमेच्या बाजूंचा विकासाला अधिक गती येण्यासाठी कसा वापर करता येईल यावर भर दिला जाणार आहे. विकासासाठी प्रत्येक विभागाने स्वतंत्ररित्या प्रयत्न करण्याऐवजी सर्व विभागांनी मिळून एकत्रित प्रयत्न केल्यास बहुआयामी विकास होईल.
           पंढरपूर तीर्थक्षेत्रांबरोबरच अक्कलकोट, श्री सिध्देश्वर महाराज, तुळजापुर असे तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रामुख्याने रस्ते विकासावर आणि तीर्थक्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर दिला जाणार असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.
           सोलापूर जिल्हयात रस्ते विकासाचे काम अतिशय गतीने सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यातून सोळा महामार्ग जाणार आहेत. या महामार्गाच्या विकासासाठी आणि भूसंपादनासाठी जिल्ह्यातील सुमारे 15 ते 16 हजार कोटी रुपयांचा निधी येणार आहे. या निधीच्या माध्यमातून सोलापूरच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे, असा विश्वास   डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
          सोलापूर जिल्हा यंत्रमाग उद्योगासाठी प्रसिध्द आहे. या उद्योगाला आता काही आव्हाने समोर आहेत या आव्हानांना सामोरे . जात असतानाच या उद्योगाला गतवैभव मिळवून देण्यासाठी काम करता येईल, याचा विचार सुरु असल्याचे ही डॉ. भोसले यांनी सांगितले.
         जिल्ह्यातील विकास कामांना कोणत्याही परिस्थितीत वाळू कमी पडू दिली जाणार नाही. राज्य शासनाने जाहिर केलेल्या नव्या वाळू धोरणानुसार विकास कामांना आवश्यक असणारी वाळू उपलब्ध करुन दिली जाईल. त्यासाठीची आवश्यक कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत केली जात असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *