👁 10 Views

खर्डी येथील 9 शाळांना ई-लर्निंग कॉम्प्युटर सेटचे वाटप

पंढरपूर LIVE 11 जानेवारी 2018

जि.प. सोलापूर ग्रामपंचायत खर्डी यांच्या 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून जि.प. प्राथमिक शाळा खर्डी गावठाणव वाड्यावस्त्यावरील 8 अशा एकुण 9 शाळांना ई लर्निंग सेटचे वाटप युटोपियन शुगर्सचे चेअरमन उमेशराव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.

याचवेळी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षण परिषदेकडून देण्यात येणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार सि.म. विद्यालय खर्डी येथील शिक्षक चंद्रकांत भागवत रोंगे यांना देण्यात आला त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर महात्मा जोतीबा फुले परिषदेकडून दिला जाणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार बोहाळी जि.प. शाळेचे शिक्षक संतोष मारुती मोरे यांना मिळाल्याबद्दल उमेश परिचारक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *