👁 10 Views

10 गुंठे माळरानावर फुलवली गुलाबाची नयनरम्य बाग..!

पंढरपूर LIVE 13 जानेवारी 2018
परळी वैजनाथ / महादेव गित्ते
सततच्या दुष्काळाने मराठवाड्यातील नागरिकांना विशेष करुन शेती करणार्‍या शेतकर्‍यांना जशा झळा दिल्या तसेच या दुर्दैवी परिस्थीतीतुन शेतीत नवीन प्रयोग करण्याच्या कल्पनाही दिल्या. यातुनच पांगरी येथील शेतकर्‍याने पारंपरिक शेती करण्याचा मार्ग बदलुन नवप्रयोगाची कास धरली. या प्रयोगाला चांगले यश ही मिळाले. यातुन या शेतकर्‍यांने केवळ १० गुंठे माळराणावर नयन रम्य अशी गुलाबाची बाग फुलवली आहे. या मधुन कमी पाण्याचा वापर व इतर पिकापेक्षा अधिक उत्पनाची हमीच या शेतकर्‍याला मिळाली आहे.
पांगरी येथील शेतकरी शशिकांत राजेभाऊ काटुळे यांची गावापासुन कांही अंतरावर मांडेखेल पाट्याजवळ शेत जमीन आहे. माळरान असलेल्या या शेतीत पारंपारिक पिकातुन उत्पन्न मिळणे अवघड झाले होते. त्यातच गेल्या चार वर्षापासुन दुष्काळाने शेतकरी होरपळुन निघाला होता. त्यानंतर गेल्या वर्षीपासुन चांगले पर्जन्यमान होत आहे. परंतु दुष्काळाच्या झळा सोसुन शहाण्या झालेल्या शेतकर्‍याला शेतीतील नवीन प्रयोग करण्याची गरज आहे याची जाणीव ही झाली. यातुनच शशिकांत यांना नविन प्रयोग करावा असे वाटले. आपल्या शेतात विंधन विहिर घेऊन उपलब्ध झालेल्या पाण्याचा कमी प्रमाणात उपयोग करत चांगले उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने त्यांनी दहा गुंठे माळरान जमीनीवर गुलाबाची शेती केली. गुलाब लागवडीचे हे त्यांचे पहिलेच वर्ष आहे. पहिल्या वर्षीच या लागवडीसाठी  खर्च होतो. मात्र एकदा लागवड झाल्यानंतर जवळपास पाच वर्षे कांही खर्च वगळता कायम स्वरुपी उत्पन्न या शेतीतुन निर्माण होते. 

दहा गुंठे जमीनवर गुलाब लागवडीसाठी शशिकांत यांनी चांगला प्लँन्ट निर्माण केला आहे. यासाठी पाण्याचा कमी वापर व्हावा या दृष्टीने ठिंबक सिंचन करण्यात आले आहे. तसेच पॉलीहाऊस निर्माण करुन पिकांची पोत सांभाळण्यासाठी काळजी घेण्यात आली आहे. यासाठी पहिल्या वर्षी जवळपास ३५ ते ४० हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. पुढील पाच वर्षे याचा उत्पन्नासाठीच लाभ होणार आहे. इतर पिकापेक्षा कमी पाणी आणि अधिक उत्पन्न यादृष्टीने हा प्रयोग यशस्वी झाला आहे. माळरानावर फुलवलेली गुलाबाची शेती आता बहरात असुन या बागेतुन निघणारी गुलाबाची फुले शशिकांत काटुळे हे परळी व परिसरात विक्रीला ठेवत आहेत. या शेतीमधुन त्यांनी केलेला हा प्रयोग इतर शेतकर्‍यांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे. परिसरातील अनेक शेतकरी या बागेला भेट देण्यासाठी गर्दी करतांना दिसत आहेत.  आपल्याकडे दुष्काळ असतांना शेती बाबत मोठी चिंता निर्माण झाली होती. पाऊस झाल्यावर आपल्या शेतीतून अधिक उत्पन्न घेण्यासाठी विचार करत असतांना गुलाबाची शेती करावी हे सुचले यासाठी विविध ठिकाणी जाऊन पाहणी केली, कृष्षी तज्ञांचे मार्गदर्शन घेतले व दहा गुंठे जमीनीवर हा प्रयोग करुन पहिला. माझी शेती यशस्वी झाली असुन निश्‍चितच इतर पिकांपेक्षा मला गुलाबाच्या शेतीतून अधिक उत्पन्न मिळत आहे.
शशिकांत काटुळे  शेतकरी, पांगरी,

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *