👁 5 Views

सोशल मिडीयावरुन छत्रपती शिवरायांचा अवमान करणार्‍या समाजकंटकाविरूध्द गुन्हा दाखल


पंढरपूर LIVE 14 जानेवारी 2018
छत्रपती शिवाजी महाराज व मराठा समाजातील महिलांविषयी व्हॉटसअप वर अपशब्द वापरणार्‍या समाजकंटकाविरूध्द पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पंढरपूर (प्रतिनिधी):- छत्रपती शिवाजी महाराज व मराठा समाजातील महिलांविषयी व्हॉटसअप वर अपशब्द वापरणार्‍या अज्ञात समाजकंटकाविरूध्द पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात भा द वि कलम 295(अ),504,34  प्रमाणे दि.14/01/2018 रोजी 19/23 वा. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याकडून समजलेली हकीकत अशी, अनोळखी 20 ते 25 वर्षे वयाचे इसमाने मराठा समाजाचे आराध्य दैवत व स्फुर्तीस्थान असणारे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द बोलुन तसेच मराठा समाजातील महिलांविषयी अर्वाच्य शब्दामध्ये बोलुन हातवारे करून दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे उद्देशाने व आमचे मराठा समाजाची धार्मीक भावना दुखावण्याच्या उद्देशाने व्हिडीओ क्लिप तयार करून ती फिर्यादी शहाजी शिवाजी ताड वय 24 वर्षे रा.एकलासपुर ता.पंढरपुर जि.सोलापुर यांना दि.13/01/2018रोजी 12/15 वा. चे सुमारास व्हॉट्सअप या सोशल मिडीयावरून व्हायरल करून धार्मीक भावना दुखावल्या असल्याने त्याच्यावर वरील कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पंढरपूर तालुकरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के.के. खराडे हे अधिक तपास करत आहेत.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *