👁 8 Views

पंढरपुरात पहिले परिवर्तन साहित्य संमेलन

पंढरपूर LIVE 20 Jun 2018

पंढरपुरकरांना काव्य मैफलीसह शाहिरी जलसाची मेजवाणी
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त पहिले परिवर्तन साहित्य संमेलन २६ जून (मंगळवार) रोजी येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन खा. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते आणि जेष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचे किर्तीपाल सर्वगोड यांनी सांगितले.
पहिल्या परिवर्तन साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष किर्तीपाल सर्वगोड हे पत्रकार परिषदे दरम्यान बोलत होते. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष डॉ. निर्मलकुमार बनसोडे, उपाध्यक्ष वैभव माने, सचिव संतोष गायकवाड, कोषाध्यक्ष सचिन कांबळे सदस्य बाबुराव धांडोरे, प्रा. डॉ. वामन जाधव, दादासाहेब दोडके, नामदेव सरवदे, विजय शिवशरण, कुंदन गाडे, राजरत्न कांबळे उपस्थित होते. 
पुढे किर्तीपाल सर्वगोड म्हणाले, संत तनपुरे महाराज मठामध्ये आयोजित केलेल्या या एकदिवसीय संमेलांचे उद्घाटन सकाळी ११ वाजता होणार आहे. सुनिल सर्वगोड, प्रा. वामन जाधव, बा. ना. धांडोरे, अमरजित पाटील,  किर्तीपाल सर्वगोड, संतोष गायकवाड, सचिन कांबळे, वैभव माने यांच्या उपस्थित उद्घाटन समारंभ होणार आहे. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत परिसंवाद शिवशाही ते भिमशाही या विषयावर श्रीमंत कोकाटे, प्रा. डॉ. विजय मोरे यांचे मार्गदर्शन हभप रामदास महाराज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. दुपारी अडीच ते चार या वेळत ‘भीमाई माऊली मायेची सावली’ हा प्रशांत मोरे यांच्या काव्य मैफलीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी चार ते सायंकाळी सहा यावेळेत ‘मानवी मूल्य आणि भारतीय संविधान’ या विषयावर प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. या वेळी अर्जुन डांगळे व डॉ. टी. एस. मोरे हे वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे व परशुराम वाडेकर हे उपस्थित राहणार आहेत. विशेष अथिती म्हणून ज्येष्ठ पत्रकार राजा माने हे मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षीय समारोप ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे करणार आहेत. सायंकाळी सात ते १० या वेळेत एल्गार सांस्कृतिक मंचाकडून जागर समतेचा संगीतमय आंबेडकरी शाहिरी जलसा हा कार्यक्रम होणार असल्याचे साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष किर्तीपाल सर्वगोड यांनी सांगितले.
यांना जीवन गौरव पुरस्कार 
श्री संत तनपुरे महाराज मठामध्ये सायंकाळी सहा वाजता राजा सरवदे, राजा इंगळे व सुनिल सर्वगोड यांना पॅँथर नामदेव ढसाळ जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यातील छायादेवी आप्पासाहेब लोखंडे, अंबादास शिंदे, शशिकांत बाबर, सिध्दार्थ जाधव, आप्पासाहेब जाधव, बाळासाहेब कसबे, मोहन ढवळे, संजय सावंत, युसूफ बागवान, जितेंद्र बनसोडे, कुमार ढवळे, राजू दंदाडे, भाऊसाहेब बंगाळे, विष्णू धार्इंजे, सुरेश शिंदे या पॅँथर्सचा विशेष सन्मान केला जाणार आहे.
 


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *