पंढरपूर LIVE 21 Jun 2018
श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये ‘जागतिक योगा दिन’ उत्साहात साजरा
पंढरपूर- ‘योगा केल्याने मन, बुध्दी आणि शरीर यांच्या समतोलपणा राहतो. जर ताणतणाव असेल तर ते कमी होण्यास मदत होवून मानवी जीवन अधिक उत्साही बनते. मागील १२ वर्षापासून इंजिनिअरिंग (पदविका व पदवी) व फार्मसी (पदविका व पदवी) या चारही महाविद्यालयातील विद्यार्थी नियमीत ‘प्राणायाम’ करतात. त्यामुळे संपूर्ण दिवसभर शारीरिक व मानसिक दृष्टया प्रसन्न मुद्रेत असतात. याचाच परिणाम त्यांच्या अभ्यासावर दिसून येतो उस्ताह आणि एकाग्रतेमुळे विद्यार्थ्यांचा फायदा होतो. यासाठी ‘योगा’ हे प्रत्येक आजारावर उत्तम औषध असून नियमित योगा केल्याने शारीरिक थकवा जाणवत नाही आणि रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि आरोग्य देखील उत्तम राहते.’ असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी केले.
श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलमध्ये चौथे ‘जागतिक योगा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे मार्गदर्शन करताना योगाचे महत्व पटवून देत होते. यावेळी योगामध्ये सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी क्रीडा मार्गदर्शक रजनी वाघमोडे म्हणाल्या ‘योगामुळे आरोग्य सदृढ होते. त्यामुळे योगाची दररोज गरज आहे. शरीर, स्वास्थ्य आणि मनाच्या एकाग्रतेबरोबर शरीराच्या प्रत्येक अवयवांकडून व्यायाम करुन घेतो.यामुळे शुद्ध मनाला अजून बळकटी मिळते. मन आणि आरोग्य बळकट असेल तर शरीर सदृढ राहून अंगीकृत कार्याला प्रतिसाद मिळते. यासाठी मन, शरीर आणि आत्मा संतुलित राहण्यासाठी नियमित योगाची गरज आहे.’ वाघमोडे यांच्या समवेत प्राजक्ता कसबे आणि तेजश्री डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली स्वेरी परिवारातील सदस्यांकडून प्राणायम करून घेतले. शरीराच्या हालचाली कशा असाव्यात, योगाचे नियम वेळ, आदी महत्व्वाच्या गोष्टी पटवून सांगितल्या. ‘जागतिक योगा दिना’च्या निमित्ताने योगासने केल्यामुळे अधिक प्रसन्नतेचा अनुभव घेताना दिसत होते. योगा झाल्यानंतर मोड आलेली मटकी आणि तुळशी चहा (ग्रीन टी)चे संस्थेतर्फे वाटप करण्यात आले. यावेळी बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलकर्णी, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे,सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख प्रा.करन पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. एस.एम.शिंदे (अभियांत्रिकी), प्रा डी.जे.यादव (फार्मसी) यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या ‘जागतिक योगा’त सहभागी झाले होते. प्रा.यशपाल खेडकर यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com