पंढरपूर LIVE 23 Jun 2018
(प्रतिकात्मक छाया)
मुंबई (प्रतिनिधी) :- फार्मसिस्टला मिळाला पाहिजे स्वस्त पर्यायी औषधे देण्याचा अधिकार ; डॉक्टर फक्त ब्रॅन्डेड औषधेच लिहून देत असतील तर रुग्णांना संबधित ब्रॅण्डच्या औषधांना पर्याय म्हणून जेनेरिक औषधे लिहून देण्याचे अधिकार औषधविक्रेत्यांना द्यावेत, अशी मागणी औषधविक्रेत्यांच्या संघटनांनी केली आहे. जेनेरिक औषधांचा प्रचार प्रसार करण्यासाठी सरकारने नवीन निर्देश जारी केले आहेत. मेडिकल स्टोअरमध्ये वेगळे शेल्फ ठेवावे असेही सांगितले आहे. प्रत्यक्षात मात्र जेनेरिक औषधांबद्दल डॉक्टरांकडून पुरेशी माहिती दिली जात नाही. त्यामुळे रुग्णांनाही ब्रॅन्डेड औषधे घेण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. महागड्या औषधांच्या किंमतीमुळे रुग्णांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबावी यासाठी महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनने संघटनेने ही मागणी केली आहे.
या संघटनेने केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात औषधविक्रेत्यांना ब्रॅन्डेड औषधांचा पर्याय म्हणून जेनेरिक औषध देण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे. औषधविक्रेत्यांना ब्रॅन्डेड औषधांना पर्याय असलेली त्याच प्रकारची, पण कमी किंमतीची जेनेरिक औषधे देण्याची परवानगी मिळावी यासाठी केंद्र सरकारने औषधे आणि सौंदर्य प्रसाधन कायद्यात बदल करावा, अशीही मागणी केली आहे. फक्त जनऔषधी केंद्रातूनच नाही तर खासगी दुकानातूनही रुग्णांना जेनेरिक औषधे मिळाली पाहिजेत अशीही संघटनेची मागणी आहे.
महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्टस असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी डॉक्टर रुग्णांना जेनेरिक औषधांऐवजी ब्रॅन्डेड औषधांची नावे लिहून देतात. त्याऐवजी डॉक्टरांनीच ब्रॅन्डेड औषधांसह पर्यायी जेनेरिक नाव लिहून दिली तर रुग्णांनाही दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. फक्त सरकारी जनऔषधी नव्हे तर भारतातील सर्व औषधविक्रेत्यांना स्वस्त पर्यायी औषध देण्याचा अधिकार मिळाला पाहिजे अशीही मागणी संघटनेने केल्याचे तांदळे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com