👁 9 Views

रमाई घरकुल योजनेच्या अनुदानासाठी समाजकल्याणमंत्री बडोले यांना निवेदन

पंढरपूर LIVE 23 Jun 2018


पंढरपूर शहरातील 274  व मंगळवेढा शहरातील 14 नवबौध्द व दलीत कुटुबांना रमाई आवास घरकूल योजनेअंतर्गत शासनाने  सात कोटी एकवीस लाख रूपये अनुदान तात्काळ उपलब्ध करावे या मागणीचे निवेदन नगरसेवक डि .राज सर्वगोड व दुर्योधन यादव यांनी राज्याचे समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना   मुबंई येथे दिले आहे.
 या बाबत  माहिती देताना नगरसेवक डि.राज सर्वगोड म्हणाले की, हे अनुदान उपलब्ध न झाल्याने 288 घरकुल लाभार्थ्यांना हक्काच्या पक्क्या घरापासून वंचीत रहावे लागत आहे. या बाबत प्रशासकिय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करुनही दखल घेतली जात नाही.यापुर्वी 4 जून रोजी पुणे विभागीय आयुक्त यांना देखील या घरकूलांचे अनुदान उपलब्ध करुन द्यावे अशा आशयाचे निवेदन दिले होते. मात्र याची दखल घेतली गेली नाही.
केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनाही याच आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.राज्याचे समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले व राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी याबाबत त्वरीत कार्यवाही केली जाईल असे अश्‍वासन दिले आहे.पुढील एक महिन्यात याबाबत कार्यवाही न झाल्यास वंचीत लाभार्थ्यांना सोबत घेवून उग्र आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *