👁 9 Views

अरिहंत पब्लिक स्कुलमध्ये दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

पंढरपूर LIVE 23 Jun 2018

पंढरपूर लाईव्हच्या सर्व व्हिडीओ बातम्या पहाण्यासाठी आमचे 
Pandharpur Live हे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा!
सदर बातमी व्हिडीओ स्वरुपात पहाण्यासाठी खाली क्लिक करा!
पंढरीतील सुप्रसिध्द बालरोगतज्ञ डॉ. शितल शहा अध्यक्ष असलेल्या येथील इंग्लिश मिडीयम स्कुल म्हणजेच अरिहंत पब्लिक स्कुल मध्ये आज दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. पंढरीतील सुप्रसिध्द जेष्ठ इंजिनिअर सलीमभाई बोहरी यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे सचिव उज्वल दोशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.

 परम गांधी (95.50%), मंदार देशमुख (94.20%),  सानिका शहा (92.20%), प्रणव कांगळे (91.80%), प्रतिक सोलनकर (91%), तुलशी राठी (90%), अभिषेक जाधव (90%) या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
संस्थेच्या प्रभारी मुख्याध्यापिका लोखंडे मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीबाबत माहिती दिली. तसेच जोशी मॅडम, राका मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गुणवंतय विद्यार्थी व त्यांच्या पालकांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. 
संस्थेचे सचिव उज्वल दोशी व कार्यक्रमाचे अध्यक्ष सलीमभाई बोहरी यांनीही विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी बिडारी मॅडम, देशपांडे मॅडम, डंके मॅडम, आवताडे सर, दिंडोरे सर व दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते.
संस्थेच्या परंपरेप्रमाणे याही वर्षी संस्थेचा दहावीच्या परीक्षेचा निकाल हा 100 % लागला असून अरिहंत पब्लीक स्कुलला पालकांची प्रथम पसंती असल्याची माहिती संस्थेच्या प्रभारी मुख्याध्यापिका लोखंडे मॅडम यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली. 

   



महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *