👁 10 Views

माजी नगरसेवक कै. नामदेव भुईटेंच्या पत्नीचा न्यायासाठी आर्त टाहो!

पंढरपूर LIVE 25 Jun 2018

भुईटे हत्येप्रकरणी सीआयडी मार्फत चौकशीची मागणी..!श्रीमती शुभांगी भुईटे यांची मागणी..! 

भरलेल्या डोळ्यांनी व दाटुन आलेल्या कंठाने 

पत्रकारांसमोर व्यक्त केल्या वेदना!

आज पंढरपूर येथील पत्रकार भवन मध्ये मोठ्या संख्येने माजी नगरसेवक नामदेव भुईटे यांचे समर्थक व मित्रपरिवारासह कै. भुईटे यांच्या मातोश्री सौ. शोभा सुरेश भुईटे व पत्नी श्रीमती शुभांगी भुईटे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये कै. भुईटे यांची हत्या होऊन 14 महिने उलटून गेले तरीही या गुन्ह्यातील सुत्रधाराचा शोध घेऊन त्यास अटक करण्यासंदर्भात कोणतीही कारवाई झालेली नाही. सांगली पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासासंदर्भात चालढकल केली जात आहे. असा आरोप करत या खुनखटल्याचा तपास सीआयडीकडे सुपूर्त करावा. अटकेत असलेल्या राजेंद्र भिंगे या आरोपीची नार्को चाचणी केली जावी व या गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करावी. अशी मागणी कै. भुईटे यांच्या पत्नी श्रीमती शुभांगी नामदेव भुईटे व मातोश्री सौ. शोभा भुईटे तसेच मुलगा सयाजी याने केलीय.

पंढरपूर लाईव्हच्या सर्व व्हिडीओ बातम्या पहाण्यासाठी आमचे 
Pandharpur Live हे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा!
सदर बातमी व्हिडीओ स्वरुपात पहाण्यासाठी खाली क्लिक करा!



या पत्रकार परिषदेस विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक भगिरथदादा भालके, दिपकदादा वाडदेकर, संदीप मांडवे, अर्जुन चव्हाण, किरण घाडगे, स्वागत कदम, संदीप मुटकुळे  यांच्यासह कै. भुईटे यांचा मित्रपरिवार, हितचिंतक व अनेक मराठा समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

आमचा संपुर्ण परिवार दहशतीच्या सावटाखाली आहे, या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधारास त्वरीत अटक होणे गरजेचे आहे. अन्यथा आमच्याही जिवीताला धोका आहे. त्यामुळे वरीलप्रमाणे त्वरीत तपासाची दिशा बदलावी, नुसते कागदी घोडे नाचविणे थांबवून गंभीरपणे या खुनखटल्याच्या तपासास गती मिळावी. अन्यथा आमचे सर्व कुटूंबिय लवकरच सांगली पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसणार आहे. यानंतरही आम्हाला न्याय मिळाला नाही तर आषाढी यात्र्रच्या वेळी शासकीय महापुजेस आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या समोर आम्ही तीव्र आंदोलन करु असा इशारा यावेळी श्रीमती शुभांगी भुईटे यांनी दिला आहे. 
   


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com



Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *