👁 7 Views

जीएसटीमध्ये होणार आणखी कपात!

पंढरपूर LIVE 1 July 2018

जीएसटीमुळे देशात अप्रत्यक्ष करांची गुंतागुंत संपलेली आहे, असे म्हणत जीएसटीच्या वर्षपूर्तीनिमित्त केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटीबद्दल समाधान व्यक्त केले. किडनी ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रियेनंतर प्रथमच त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेतला. यापुढे जीएसटीच्या स्लॅबमध्ये आणखी कपात करून सरकार नागरिकांना दिलासा देणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. 



जीएसटीमुळे करसंकलनात वाढ तर झालीच आहे शिवाय आवश्यक वस्तू आणि सेवांवरील कर कमी झाल्याने नागरिकांना दिलासाही मिळाला आहे. अॅडव्हान्स टॅक्स पेमेंटमुळे सकल उत्पन्नात वाढ झाली आहे. जीएसटीमुळे भारत संघटित बाजारपेठ बनला आहे, असेही जेटली म्हणाले. 


‘गेल्या वर्षी जुलैमध्ये आम्ही देशातली सर्वात मोठी गुंतागुंतीची कर प्रणाली संपुष्टात आणली. तेव्हा १३ मल्टीपल टॅक्स आणि ५ मल्टिपल कर परतावे अस्तित्वात होते. टॅक्सवर टॅक्स लागून लोक हैराण होत होते. प्रत्येक राज्याचे स्वत:चे वेगवेगळे कर दर होते आणि त्यानुसार कर परतावा फाईल होत होता. देशाची संघराज्य पद्धतीची रचना लक्षात घेऊन आम्ही ही करप्रणाली तयार केली.’


  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *