पंढरपूर LIVE 2 July 2018
बीड ( निलेश चाळक याजकडून) शाळा सुरु झाल्या की पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके दिली जाणार असल्याची घोषणा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केली होती. मात्र पंधरा दिवस झाले तरी पात्र विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद पुस्तके देऊ शकली नाही. घोटाळे बहाद्दर जिल्हा परिषदेचा हा पुस्तक वाटपातील घोटाळा तपासला पाहिजे. पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ पुस्तके पूरवा अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा देत सर्व पुस्तके पालकांनी शाळेतूनच घ्यावीत, दुकानातून आणू नयेत, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिला आहे.
शाळा सुरु होण्याच्या अगोदर शिक्षण विभागाने केलेली घोषणा हा विद्यार्थ्यावर केलेला उपकार नव्हता. पुस्तके पुरविणे ही शासनाची योजना आहे. मात्र लबाडी सर्वत्र शिरल्याने विध्यार्थ्यांना सुद्धा जिल्हा परिषदेच्या या भ्रष्टाचाराला तोंड देण्याची वेळ आली आहे. बाल वयातच विद्यार्थ्यांवर असे संस्कार घडविणारी जिल्हा परिषद चांगल्या सुविधा कधी देणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.
लाखावर विद्यार्थ्यांना सरकारच्या योजनेप्रमाणे पुस्तके वाटली गेली पाहिजे होती. मात्र अर्ध्यावर पुस्तके शाळेत का आली नाहीत? ती नेमकी कोणी खाल्ली? आता तरी पुस्तकांचे वाटप होणार आहे का ? असे अनेक प्रश्न आता उभे आहेत.
प्रत्येक विद्यार्थ्याचा पालक जाऊ द्या दोन – तीनशे रुपये असे म्हणून पुस्तके दुकानातून खरेदी करताना दिसत आहे. लाखावर विद्यार्थ्यांची ही पुस्तके काही कोटींची होऊ शकतात. त्यामुळे हा घोटाळा अधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक आणि अन्य लोक प्रतिनिधी यांच्या संगनमतातून झालेला असू शकतो. जिल्हा परिषद भ्रष्ट कामाने बरबटलेली असल्याने तेथे सर्व काही होऊ शकते.
मोफत शिक्षणाचा डंका सरकार पिटत असले तरी ही बोगसगिरी मुलींनाही मोफत शिक्षण योजनेचा फायदा घेऊ देत नाही. हे यातून सिद्ध होत आहे. विशेष बाब म्हणजे असे घडत असले तरी सर्व पालक मूग गिळून गप्प का आहेत ? यावरही चिंतन व्हायला हवे.
जिल्हा परिषदेचे अधिकारी जर अशा प्रकारावर लक्ष ठेवू शकत नसतील तर ते घोटाळ्यात सहभागी आहेत का ? असा प्रश्नही जनता उपस्थित करीत आहे. लाखो आणि करोडो रुपयांच्या योजना फस्त होताना त्यात सहभागी होणारे आणि तक्रारी येऊनही कारवाई न करणारे पापी अधिकारी याला जबाबदार आहेत. भ्रष्ट नसलेले अधिकारी कारवाई करतात मात्र भ्रष्टाचाराच्या गटार गंगेत हात धुवून घेणारे अधिकारी गप्प असतात. काही करावे तर संगनमत सहभागी असल्याने त्यांची बुद्धी चालत नाही.
पात्र विद्यार्थ्यांच्या सर्व पालकांनी सर्व पुस्तके शाळेतून घ्यावीत. देत नसतील मुख्याध्यापकाला दोन दिवसाची संधी द्यावी. अन्यथा शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे. शाळांना कुलूप ठोकण्याचा इशारा द्यावा. मात्र पुस्तके शाळेतून घ्यावीत.
करोडोंचा घोटाळा थांबवण्यासाठी गावातील पालक आणि तरुणांनी पुढे यावे. मुख्याध्यापक आणि शालेय शिक्षण समितीला जाब विचारावा. गावातच प्रश्न सुटला नाही तर तालुक्याच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांसमोर हा विषय न्यावा. शिक्षणाधिकाऱ्यांनाही जाब विचारावा. विशेष म्हणजे ज्यांनी पहिल्या दिवशी पुस्तके देण्याची घोषणा छापून प्रसिद्धी मिळविली, त्यांना ते दिसतील तेथे जाब विचारावा, असे अँड. देशमुख यांनी म्हंटले आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com