👁 11 Views

50%फिस भरून मराठा विद्यार्थ्याना प्रवेश न देणार्या महाविद्यालयावर कारवाई करा नसता आदोंलन करणार :- निलेश चाळक

पंढरपूर LIVE 3 July 2018

बीड :-राज्य सरकारने मराठा तरूणांना 50%फिस भरून प्रवेश देण्याबाबतचे आदेश राज्यसरकारने दिलेले असताना ही मराठा विद्यार्थ्याना पुर्ण फिस भरून प्रवेश दिला जात असल्याने आज मराठा आरक्षण विद्यार्थी क्रुर्ती समिती सह सुराज्य सेनेच्या वतीने  शासनाचे आदेश असतानाही 50%फिस भरून मराठा विद्यार्थ्याना प्रवेश न देणार्या महाविद्यालयावर कारवाई करा  याबाबतचे निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,गेल्या वीस ते पंचोविस वर्षापासून महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण द्यावे म्हणून मोठी चळवळ उभा करण्यात आली होती मराठा समाज हा अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे मराठा तरूणांना प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षण करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत तर अनेक मराठा तरूणांनी माध्यामिक आणि  महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करण्यासाठी पैसे नसल्याने आपले शिक्षण अर्धवट सोडले या सह अनेक अडचणीना मराठा तरूणांना समोरे जावे लागत होते त्या मुळे राज्यसरकारने दि,28/जून /2018 रोजी 1)राज्यातील शासकिय/शासन अनुदानित/खाजगी विनाअनुदानित व दंत महाविद्यालयातील आर्थिक दुर्ष्ट्या दुर्बल घटकाची एम बीबीएस व बी डी एस अभ्यास क्रमाच्या पाञ विद्यार्थ्याना आरोग्य विन्यानाच्या ईतर व्यवसायिक अभ्यास क्रमाप्रमाणे राजश्री छञपती शाहू महाराज शिष्यव्रुती योजनेअतर्गत त्यांच्या शिक्षण शुल्काच्या 50% शिष्यव्रुती अदा करण्याच्या अनुशगांने दोन्ही पालकांची एकञित वार्षिक उत्तपन्न मर्यादा 6 लाखावरून 8 लाख करण्यास शासनाची मान्यता प्रदाण करण्यात येत आहे 2) या योजनेचा लाभ हा शैषणिक वर्ष 2018/19 पासून राहील.3)उपरोक्त शासन निर्णयानुसार सन 2018/19 पासून आरोग्य विन्यानाच्या मान्यता प्राप्त व्यवसायिक अभ्यास क्रमातील आर्थिक द्रुष्ट्या दुर्बल घटकातील ज्या विद्यार्थ्याच्या पालकांचे एकञित 8 लाखाच्या मर्यादेत असेल  त्या विद्यार्थ्याना राजर्षी छञपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेअतर्गंत  50% शिक्षण शुल्क शिष्यव्रुतीचा लाभ अनुयनेय होईल. 4)उत्तपन्न मर्यादेतील वरील सुधारनेनुसार राजश्री छञपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यव्रुती योजना ही विहीत अटी व शर्थीनुसार पुर्वी प्रमाणेच राबवण्यात येईल 5) हा शासन निर्णय मंञीमंडळ उपसमितीच्या मान्यतेने व अनौपचारीक सदर्भ क्रंमाक 255/2018/व्य /13 दि,26/06/2018 अन्वेय प्राप्त सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

 असे राज्य सरकारने आदेश काढलेेले असताना ही बीड जिल्ह्यातील आणि मराठवाडा विभागातील शाळा,महाविद्यालयाकडूनया आदेशाचे पालन होत नाही आणि मराठा विद्यार्थ्याकडे शाळा महाविद्यालयाकडून पुर्ण फिस भरण्याची मागणी होत आहे त्यामुळे अशा शाळा महाविद्यालयावर कायदेशिर कारवाई करण्यात यावी व मराठा विद्यार्थ्याना 50%शुल्क भरूनच प्रवेश देण्यात यावा नसता मराठा तरूणांना सोबत घेवून त्रीवआदोलन करण्यात येईल असा ईशारा मराठा आरक्षण विद्यार्थी क्रुर्ती समिती बीड जिल्हा प्रमुख निलेश चाळक यांनी प्रसिध्दी माध्यामाशी बोलताना दिला आहे यावेळी विनोद कुटे,आशोक ढोले,सतिराम ढोले संदीप मोरे या सह आदी उपस्थित होते

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *