👁 10 Views

स्वेरीच्या २० विद्यार्थ्यांची आर.बी. इलेक्ट्रॉनिक्स कंपनीतील निवड सार्थ

पंढरपूर LIVE 3 July 2018

पंढरपूरः- आर.बी. इलेक्ट्रॉनिक्स’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील २० विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली असून प्रत्येक वर्षीच्या तुलनेत यंदा निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत आणखी भर पडणार आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

         
आर.बी. इलेक्ट्रॉनिक्स या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीचे संचालक उदित संघवी आणि व्हाईस प्रेसिडेंट सुधाकर पोळ व त्यांच्या निवड समितीने घेतलेल्या इंटरव्यूवमध्ये गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीतून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची शिस्त व उत्कृष्ट शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित झाली. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे शुभम भानवसे, अक्षय डमरे, अक्षय गायकवाड, अश्विनी काशीद, ललिता पवार, विशाल माने, प्रतिक मोरे, मेघा पवार, अस्मिता कांबळे, प्रियांका सरफळे, स्वाती माने, प्रतीक्षा मोटे, हर्षा नागणे, नितीन होनराव, प्रशांत सुके, सुशांत भोसले, अजय कोकाटे, राहुल हिलालपुरे, मोहीनी घोडके आणि विजयालक्ष्मी जगताप असे मिळून एकूण वीस विद्यार्थ्यांची कंपनीत निवड झाली. श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटचे प्रमाण अधिक तीव्रगतीने वाढत असून नियमित नवनवीन व आंतरराष्ट्रीय कंपन्या स्वेरीत येतात आणि कंपनीसाठी पात्र विद्यार्थी निवडतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी स्थिर होवून आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात, याचा सखोल अभ्यास करून मागणी तसा पुरवठाया तत्वाप्रमाणे संबधित प्रशिक्षण विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांद्वारे दिले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ.माधव राऊळ व प्रा.एस.व्ही.दर्शने, प्रा. डी.ए.कुंभार आदी प्राध्यापकांचे बहूमोल मार्गदर्शन लाभले आहे. शिक्षण क्षेत्रातील अनेक मानांकनाबरोबरच ‘एन.बी.ए’ आणि ‘नॅक’असे दुहेरी मानांकन मिळविलेले एकमेव महाविद्यालय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल ‘स्वेरी’कडे कायम राहिला आहे. विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विषेशतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष प्रा.सी.बी. नाडगौडा तसेच संस्थेतील विश्वस्त, स्वेरीच्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख डॉ. अनुप विभूते, इतर अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख,प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.   

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *