👁 9 Views

पंढरपुर सिंहगडची प्लेसमेंट मध्ये उतुंग झेप… पंढरपुर सिंहगडाच्या ३० विद्यार्थ्याची कोज्या टेक्नॉलॉजीस् प्रा. लिं. कंपनीत प्लेसमेंट द्वारे निवड

पंढरपूर LIVE 4 July 2018

     पंढरपुर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध कंपनीत नोक-या देऊन स्वत:च्या हिमतीवर यशस्वी इंजिनिअर घडविण्याचे काम पंढरपुर सिंहगड करत असुन या महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अॅड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागातील अशा एकूण ३० विद्यार्थ्यांची जगातील नामवंत असलेल्या कोज्या टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीत निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

      विद्यार्थ्यांचे कौशल्य व टॅलेंट पाहून  एस. के. एन. सिंहगड कॉलेज कोर्टी-पंढरपूर महाविद्यालयात आयोजित केलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मधुन इलेक्ट्रॉनिक्स अॅड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील शरद रोकडे, व्यंकटेश देशपांडे, बाळासाहेब वलेकर, कपिल पानसरे, महेश राऊत, अविनाश यादव, नितीन कलागते, रविकिरण टाकळे, विकास कसबे तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागातील सुमित मुके, ऋषिकेश देशमुख, अभिषेक नागणे, संकेत माने, रोहित मस्के, संदेश दीक्षित, उमेश गडदे, सुधाकर घोडके, ज्ञानेश्वर जाधव, अमर जाधव, उत्कर्ष कदम, स्वप्नील कांबळे, विक्रम कुपसे, शाहरुख मुलाणी, परमेश्वर नवले, विजय पवार, ज्ञानेश्वर शिंदे, सुदर्शन व्यवहारे, संजय याड्डे, नितीन झगडे, गणेश झांबरे आदी विद्यार्थ्यांची मुलाखतीमध्ये बौद्धिक चाचणी घेण्यात आली. यावेळी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांची कमालीची शिस्त, समर्पक, योग्य व अचूक उत्तरे दिल्यामुळे कंपनीच्या अधिका-र्यांनी आंनद व्यक्त केला. कंपनीत आवश्यक असलेले गुण पंढरपूर सिंहगड मधील विद्यार्थ्याकडे दिसून आल्यामुळे ३० विद्यार्थ्याची निवड मुलाखती घेऊन करण्यात आली आहे.

       पंढरपुर सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोज्या टेक्नॉलॉजी प्रा. लि. या नामवंत कंपनीत काम करण्याची संधी मिळणार असल्यामुळे पालकांमधुन आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगेडॉ. चेतन पिसेडॉ. रविंद्र व्यवहारेप्रा. सुभाष पिंगळेप्रा. श्रीनिवास गंजेवारप्रा.अल्ताफ मुलाणीप्रा. अमोल क्षीरसागरप्रा. दिपक कोष्टी,प्रा.सुर्यकांत पाटील आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *