👁 11 Views

आपले जी-मेल सुरक्षीत आहे का? जी-मेल ची सुरक्षितता धोक्यात!!

पंढरपूर LIVE 5 July 2018

लोकप्रिय ई-मेल सेवा असलेल्या जीमेलच्या सुरक्षा धोरणांमधील एक गंभीर बाब समोर आली आहे. यानुसार थर्डपार्टी डेव्हलपर्सना युजर्सचे ई-मेल्स वाचण्याचे अधिकार गुगलकडून देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात यावर प्रकाश पडला आहे. इतकेच नव्हे, तर गुगलनेही हे मान्यही केले आहे. 

जीमेलच्या सेटिंग्जमध्ये आपण मान्य केल्यानुसार थर्ड पार्टी डेव्हलपर्सना आपले ई-मेल वाचण्याची परवानगी देण्यात येते. या संदर्भात एक स्क्रीन शॉट प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये युजरचा ई-मेलआयडी, त्याला ज्या व्यक्तीकडून ई-मेल आला त्याचा मेल आयडी आणि संपूर्ण मेल दिसत आहे. 

हा सर्व तपशील उघड झाल्यानंतर गुगलने आम्ही केवळ अनुभवी आणि व्हेरिफाइड डेव्हलपर्सना असे अधिकार देत असल्याची कबुली गुगलने दिली. या डेव्हलपर्सची आपल्याकडून पडताळणी केली जाते, तसेच ही माहिती देण्याची परवानगी युजरकडून घेतली जाते, असा दावाही गुगलने केला आहे.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *