पंढरपूर LIVE 6 July 2018
पंढरपूरः- ‘कोलॅब-एरा टॅक्ट’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली असून प्रत्येक वर्षीच्या तुलनेत यंदा निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत आणखी भर पडणार आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
‘कोलॅब-एरा टॅक्ट’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीचे प्रमुख एच आर. भावना श्रीवास्तव, जया राजिया व त्यांच्या निवड समितीने घेतलेल्या इंटरव्यूवमध्ये गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीतून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची शिस्त व उत्कृष्ट शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित झाली. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील दत्तराज चिल्लाळ, समाधान डोके, निखील देशमाने, स्नेहल बाजारे, श्रीराज जाधव, राहुल हिप्परकर आणि बुद्धप्रिय कांबळे असे सात विद्यार्थी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे सिद्देश शिंदे, श्रद्धा दुरुगकर व शिवानी शिरकांडे असे तीन विद्यार्थी तर कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंगचे श्रद्धा शिंपले व भागवत खांडेकर हे दोघेजण असे मिळून एकूण १२ विद्यार्थ्यांची ‘कोलॅब-एरा टॅक्ट’ कंपनीत निवड झाली. श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटचे प्रमाण अधिक तीव्रगतीने वाढत असून दररोज नवनवीन व आंतरराष्ट्रीय कंपन्या स्वेरीत येतात आणि कंपनीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड करतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी स्थिर होवून आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात, याचा सखोल अभ्यास करून ‘मागणी तसा पुरवठा’या तत्वाप्रमाणे संबधित प्रशिक्षण विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांद्वारे दिले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ.माधव राऊळ व प्रा.एस.व्ही.दर्शने, प्रा. डी.ए.कुंभार आदी प्राध्यापकांचे बहूमोल मार्गदर्शन लाभले आहे. शिक्षण क्षेत्रातील अनेक मानांकनाबरोबरच ‘एन.बी.ए’ आणि ‘नॅक’असे दुहेरी मानांकन मिळविलेले एकमेव महाविद्यालय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल ‘स्वेरी’कडे कायम राहिला आहे. विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विषेशतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा.सी.बी.नाडगौडा तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरीच्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख प्रा. सचिन गवळी, डॉ. अनुप विभूते,प्रा. व्ही.डी. जाधव इतर अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख,प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com