👁 6 Views

पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


पंढरपूर: प्रतिनिधी

कोर्टी (ता.पंढरपूर) एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात २६ जानेवारी २०२३ रोजी महाविद्यालयाच्या पटांगणात ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


   पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर तथा विद्यमान प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यादरम्यान उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, इस्टेट मॅनेजर प्रा. रोहन नवले, सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवले यांची प्रमुख उपस्थिती होती.


    सिंहगड इन्स्टिट्युट मधील सेक्युरीटी गार्ड सह पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांनी संचालन करून ध्वजाला सलामी दिली.


   भारतात देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी महापुरुषांनी केलेल्या कार्याचे पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांकडून महापुरुषांच्या वेशात गीतावर सादरीकरण करण्यात आले. याशिवाय देशभक्तिपर गीते, समुह नृत्य, वैयक्तिक डान्स इत्यादी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.

    या कार्यक्रमास पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूट मधील सर्व विद्यार्थी, पालक,  शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *