पंढरपूर LIVE 11 July 2018
पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्त वारक-यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या ३ हजार ७८१ बसगाड्या राज्यभरातून धावतील. १८ ते ३० जुलैला महामंडळाने त्यासाठी नियोजन केले आहे. त्याचवेळी भाविकांना देहू-आळंदीसह नजीकच्या धार्मिकस्थळांना भेट द्यायची असल्यास अशा भाविकांसाठी विशेष बसगाड्यांच्या उपलब्धतेची तत्परताही महामंडळाने दाखवली आहे.
महसूलवृद्धी आणि खासगी वाहतुकीला आळा घालणे हे उद्देश महामंडळाच्या तयारीमागील आहेत. राज्यभरातील पालखी, दिंड्या आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. २३ जुलैच्या आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी रिंगण सोहळ्याची अनुभूति घेण्यासाठी भाविक मार्गस्थ होतात. अशा विठ्ठलभक्तांचा प्रवास अधिक सुखकर व सोइस्कर होण्यासाठी महामंडळाने आपल्या सहाही विभागातून बसगाड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी तिनशेहुन अधिक अधिकारी कर्मचा-यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सहाय्यक वाहतूक अधिकारी, वाहक निरीक्षक, सहाय्यक वाहक निरीक्षक, वाहतूक नियंत्रक असे १९७ अधिकारी नियुक्त केले आहेत. त्याचप्रमाणे, ऐनवेळी बसेसला बिघाड होण्याची शक्यता गृहित धरून यांत्रिकी, विद्युत कर्मचा-यांसह टायर फिटर, मदतनीस, स्वच्छता कर्मचारी असे ११० कर्मचारीही औरंगाबाद, नाशिक, पुणे या विभागातून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बसगाड्यांसाठी पुरेशा इंधनाचीही व्यवस्था केली असून तिकीटांसाठीचे इटीआय मशिन चार्जिंग, दुरुस्तीसाठीचे पुरेसे स्पेअरपार्ट, तिकीट रोल उपलब्ध करून देण्याचे आदेश ट्रायमॅक्स कंपनीला दिले आहेत.
- वारक-यांसाठीच्या सुविधा
- पंढरपूरकडे जाणे व परतीच्या प्रवासासाठीचे बसगाड्यांचे वेळापत्रक विभागासह आगारांच्या बसस्थानकावर लावणार. परतीच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण व्यवस्थेसह संगणकीय आगाऊ आरक्षणही चंद्रभागा, विठ्ठल कारखाना, भीमा या यात्रा बसस्थानकांवर २४ तास उपलब्ध असणार.
- भाविकांच्या स्वागतासह सुरक्षिततेसाठी आगारात सतत उद्घोषातून सूचना दिल्या जातील. सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी एसटी बसनेच प्रवास करावा, खिसे कापूपासून सावधान, सामानाची काळजी घ्या, बेवारस सामानास हात न लावता माहिती द्या आदी स्वरुपाच्या घोषवाक्ये असतील.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com