👁 10 Views

पालखी तळांची पहाणी करा अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या सूचना

पंढरपूर LIVE 12 July 2018

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा

पंढरपूर दि. 12 :  आषाढी वारी सोहळ्यासाठी संताच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वी पालखी तळावरील इमर्जन्सी ऑपरेटिंग सेंटर प्रमुखांनी पालखी तळास भेट देऊन तेथील कामांची आणि वारकरी- भविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर रामचंद्र शिंदे यांनी आज
 दिल्या.  
 पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आज सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी नैसर्गिक आपत्ती प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, यावेळी शिंदे यांनी या सूचना दिल्या. तुकाराम भवन येथे झालेल्या या कार्यशाळेस उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, शिवाजी जगताप, शमा पवार-ढोक, उपविभागीय पोलीस  अधिकारी अनिकेत भारती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, तहसिलदार मधुसूदन बर्गे उपस्थित होते.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

श्री. शिंदे यांनी सांगितले की, जिल्ह्यात 17 जुलै 2018 रोजी संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या तर 18 रोजी संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन होत आहे. प्रमुख पालखी मार्गावरील विविध व्यवस्थांसाठी 21 इमर्जन्सी ऑपरेटिंग सेंटर स्थापन करण्यात आले आहेत. या सेंटरवर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पालखी तळाला 17 जुलै पूर्वी भेट देऊन पाहणी करावी. पालखी तळावर असलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना द्याव्यात. इमर्जन्सी ऑपरेटिंग सेंटरवर नियुक्त अधिकारी-कर्मचारी उपस्थित राहतील याची जबाबदारी ईओसी प्रमुखांची असेल. इमर्जन्सी ऑपरेटिंग सेंटर 17 ते 27 जुलै पर्यंत सुरु ठेवावेत. 
वारकऱ्यांच्या समस्या नीट ऐकूण घ्याव्यात, त्यांना आवश्यक माहिती द्यावी. यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण असला तरीही भाविकांना दुरुत्तरे करु नका अशा सूचना श्री. शिंदे यांनी दिल्या.औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे का, पिण्याच्या पाण्याचे टँकर येण्या-जाण्यासाठी  रस्ता योग्य आहे का  याची  पाहणी करावी. यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास त्या सुधारणा संबंधित यंत्रणेकडून करुन घ्याव्यात.

संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने संवाद वारी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातील चित्ररथ, प्रदर्शन, एलईडी मोबाईल व्हॅन, कलापथक आणि पथनाट्य सादर करणाऱ्या पथकांसाठी योग्य जागा मिळवून देण्यासाठी इमर्जन्सी ऑपरेटिंग सेंटर प्रमुखांनी सहकार्य करावे, अशा सूचना उप विभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.

इमर्जन्सी ऑपरेटिंग सेंटरवर नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांनी कामात हयगय केल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी, असे श्री. ढोले यांनी सांगितले.
            65 एकर परिसरात ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे अशा अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिंड्यांसाठी जागा वाटप करताना मापदंडाचे काटेकोर पालन करावे, असे ढोले यांनी सांगितले. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पथकाने नैसर्गिक आपत्ती निवारण करण्याची प्रात्यक्षिके दाखविली. नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास काय उपाय योजना कराव्यात, आपत्ती टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याबाबतच्या सूचना पथकातील अधिकाऱ्यांनी कार्यशाळेतील उप‍स्थितांना  दिल्या.
            यावेळी तहसिलदार विनोद रणवरे, रमा जोशी, ऋषीकेष शेळके, अमोल माळी, प्रमोद कदम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विशाल बडे आदी उपस्थित होते.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *