👁 9 Views

जगद्गुरु संत तुकोबारायांच्या पालखीने रोटी घाट केला पार

पंढरपूर LIVE 12 July 2018

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीने (वरवंड, ता. दौंड) येथील आपला मुक्काम संपवला. विठुरायाच्या भेटीच्या ओढीने आज गुरुवारी सकाळी ७ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान केले. पालखी बारामतीकडे जात असताना वाटेत रोटी घाट लागतो. घाटा दरम्यान पालखीचा रथ ओढण्यासाठी रथाला सहा बैलांची जोडी लावली होती. यावेळी महाराजांच्या रथाने पाऊण तासाच्या आत घाटाचा २ किलोमीटर अंतराचा टप्पा पार केला. तसेच घाटाच्या मध्यभागी आल्यावर आरती करण्यात आली.

पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

घाटातून जात असताना टाळ मृदंगाच्या तालात वारकरी भक्ती रसात बुडून गेले होते. घाटात प्रथम प्रवासास सुरुवात केली, तेव्हा विठ्ठलाचा जयघोष करीत आनंदाने वारकरी धावत होते. रोटी घाट पार केल्यावर पुढील मुक्कामासाठी गवळ्याच्या उंडवडीकडे पालखी र्गस्थ झाली. मार्गावरील पाटस येथे सकाळी ८:३० वाजता पोहचल्यानंतर पालखीने विसावा घेतला. वारकरी भाविक भक्तांनी विश्रांती घेत पाटस ग्रामस्थांच्या वतीने भाविकांना जेवण देण्यात आले. दीड तासाच्या विश्रांतीनंतर पालखी मार्गस्थ झाली. 

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *