👁 8 Views

पंढरपूर तालुक्यात एमआडीसी मंजूर करा… अन्यथा मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार

पंढरपूर LIVE 12 July 2018

दूध उत्पादकांना थेट प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्या…

  पंढरपूर शहर व तालुक्यात मोठे उद्योग व्यवसाय नसल्याने बेरोगारीचे प्रमाण मोठे आहे.ग्रामिण भागातील बहुतांशी तरुण नोकरीसाठी मोठया शहरांकडे नाईलाजास्तव धाव घेत आहेत.अशा बेरोजगार युवकांच्या गावाकडेच मागे राहीलेल्या कटुुंबाचे मोठे हाल होत आहेत.त्यामुळे तरी निदान मानवतेच्या द्रष्टीकोणातून तरी पंढरपूर तालुक्यात एम.आय.डी.सी.व्हावी,मोठे उद्योग उभारावेत. उजनी धरणाच्या पाणी वाटपाचे प्रकटीकरण करताना उजनी धरण ते अक्कलकोट तालुक्यातील हिळ्ळी बंधारा पर्यंत भीमा नदीस कालव्याचा दर्जा देण्यात यावा.राज्य शासनाने दुध भुकटीसाठी प्रतिकिलो पाच रुपये अनुदान जाहीर केले आहे.वास्तवीक पाहता शासनाच्या या निर्णयाचा फायदा फक्त बडे प्रक्रिया उद्योजक उचलणार आहेत.त्यामुळे राज्य शासानाने थेट शेतकर्‍यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे अशा आशयाचे निवेदन आज शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणच्या वतीने तहसिलदार मधुसुदन बर्गे यांना दिले असून या बाबत शासनाने सकारात्कम निर्णय जाहीर न केल्यास आषाढी एकादशी महापुजेसाठी येणार्‍या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवू असा इशारा देण्यात आला आहे. 

   या बाबत अधिक माहीती देताना शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणचे जिल्हा कार्याध्यक्ष  गणेश गोडसे म्हणाले की, पंढरपूर तालुक्यात सद्या कुठलाही रोजगार देणारा बडा व्यवसाय अथवा उद्योग नव्याने उभारला गेला नाही.त्यामुळे हजारो बेरोजगार युवकांना उदरनिर्वाहासाठी महानगरामध्ये स्थलांतरीत व्हावे लागले आहे.तर त्यांचे कटुुंबीय मात्र सद्या अतिशय हालाखीचे जिवन जगत आहे.त्यामुळे पंढरपूर तालुक्यात एमआयडिसी झाली पाहीजे ही आमची मागणी आहे.त्याच बरोबर दुधउत्पादकांच्या मागण्याबाबतही शासन उद्योगपती धर्जिणे धोरण राबवीत आहे.त्याचा थेट शेतरकर्‍यांना लाभ होत नाही.शासनाचे या महत्वपुर्ण विषयाकडे लक्ष वेधन्यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे.
      हे निवेदन देताना बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर,गुरसाळेे ग्रा.प.सदस्य विलास कवडे,सोमा ढवण,बालाजी खंदारे,विकास घोलप,गोटू जाधव,नवनाथ चव्हाण,पोपट नागटिळक आदी उपस्थित होते.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *