👁 9 Views

माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन ; पालकमंत्री विजय देशमुख यांच्या कडून स्वागत

पंढरपूर LIVE 17 July 2018

  
पंढरपूरदि. 17 :  पंढरपूर दि. 17 : आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने आळंदीतून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री विजय देशमुख यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करून पालखीचे स्वागत केले.
ध्यास हा जीवाला पंढरीशी जाऊ।
पंढरीचा राणा डोळे भरून पाहू।
 या उक्तीप्रमाणे अखंड हरिनामाच्या गजरात पालखीचा जिल्हाप्रवेश झाला.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी स्वागत समारंभास आमदार हणमंतराव डोळसपरभणीचे खासदार संजय जाधवपंचायत समिती सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसलेजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुडपोलीस अधीक्षक विरेश प्रभूअतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदेअतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहितेसहायक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळेप्रांत अधिकारी शमा ढोक-पवारतहसीलदार बाई मानेगट विकास अधिकारी अमोल ताकभाते आदी उपस्थित होते.
माऊलींच्या पालखीचे आगमन सकाळी 10.45 च्या सुमारास धर्मपुरी येथे झाले. तत्पूर्वी सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी श्वेता सिंघलपोलीस अधीक्षक संदीप पाटीलतसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांनी माऊलींच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला. 
पालखी अगमनापूर्वी आयोजित कार्यक्रमात धर्मपुरी येथे पर्यावरण निर्मल वारी पथकपोलीस प्रबोधन पथक सहभागी झाले होते. तसेच भारुडप्रवचन यासारख्या माध्यमातून वारक-यांमध्ये जागृती  करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आले. पालखीचे आगमन झाल्यानंतर पालखीसमवेत पालकमंत्री विजय देशमुखजिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसलेजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुडपोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांनी पायी चालण्याच्या आनंद घेतला. धर्मपुरी येथे विसावा घेऊन माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी नातेपुतेकडे रवाना झाली.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *