👁 10 Views

स्वेरीचे सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांचा पंढरपुरात जल्लोषात स्वागत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांचा दणदणीत विजय

पंढरपूर LIVE 19 July 2018

पंढरपूर- (संतोष हलकुडे यांजकडून) अवघ्या सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर विद्यापिठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत संस्था प्रतिनिधी म्हणून गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे सर यांनी दणदणीत विजय मिळवून सोलापूर विद्यापीठावर देखील पंढरपूरची मोहोर उमटवली. विद्यापीठातून पंढरपूरात परतल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
             लक्षवेधी लढतीत स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे हे घवघवीत मतांनी निवडून आले. अत्यंत प्रतिष्टेच्या लढतीकडे सोलापूरातील शैक्षणिक संस्थाचालकांसह राजकीय नेत्यांचे लक्ष लागले होते. एकीकडे सोलापूर जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष पर्वणी ठरलेल्या स्वेरीचे योग्य नियोजनामुळे अल्पावधीत नावारूपास आलेल्या ‘पंढरपूर पॅटर्न’च्या शिक्षण पद्धतीमुळे आणि नियोजनामुळे स्वेरीला मिळालेले यश आणि विद्यार्थ्यांची होत असलेली विकासाची गरुडझेप यामुळे डॉ. रोंगे यांची बाजू अधिक भक्कम झाली. सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे यांचे शिक्षण क्षेत्रातील भरीव कार्य, अभाविप, विद्यापीठ विकास मंच, राज्यपाल नियुक्त सदस्य आणि काही संस्था प्रतिनिधी यांची साथ लाभली तसेच विद्यापीठाच्या राजकारणात सक्रीय असल्याचा लाभ त्यांना मिळाला. प्राचार्य डॉ. रोंगे यांना ही निवडणूक सहजासहजी जिंकता येईल असे वाटले नव्हते. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. अखेर ३५ मते डॉ. रोंगे यांना मिळाली आणि ते विजयी झाले. डॉ. रोंगे यांच्या झंझावाती विजयामुळे राजकीय गणितांची सर्व सूत्रे बदलली असली तरी शैक्षणिक संस्थाच्या प्रमुखांचा डॉ. रोंगे यांच्या अभ्यासू धोरणाचा फायदा होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. सोलापूर विद्यापीठ परिसरात पेढे वाटून फटाके फोडत अक्षरशा दिवाळी साजरी करण्यात आली. तर पंढरपूर परिसरात तसेच परिसरात ठिकठिकाणी गुलाल उधळून, पेढे वाटून आनंद साजरा करण्यात येत आहे. स्वेरी कॉलेज कॅम्पसमध्ये देखील डॉ. रोंगे यांचे औक्षण करून सत्कार करण्यात आले. सत्कारासाठी अनेक मान्यवर कॉलेजमध्ये आले होते. विजयानंतर बोलतांना सचिव व प्राचार्य डॉ.रोंगे म्हणाले की, ‘हा विजया माझ्या एकट्याचा नसून स्वेरी परिवारातील प्रत्येक सदस्यांचा, विद्यार्थ्यांचा आहे. जो पाया रचला त्याच भक्कम पायावर हे यश मिळाले असून हे यश मी स्वेरीला अर्पण करतो. मी प्रत्येक कार्यात सकारात्मक विचार करून त्या प्रकारे वाटचाल करतो. यासाठी मानसिक दृष्ट्या तयारी करून कामकाज करण्याचा प्रयत्न करावे लागते. चूक झाली तर त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पुढे चुका ह्या कमी होतात. स्वेरीतील प्रत्येक सदस्य असा मानसिक दृष्ट्या सदृढ झाला पाहिजे असे कार्य हातून घडले पाहिजे. हा विजय हा प्रत्येक सदस्यांचा आहे.मी सर्वांचे आभार मानतो. ज्या कार्यासाठी मला निवडून दिले त्या कामांना प्रथम प्राधान्य देवून योग्य कार्य करेन.’ अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. यावेळी स्वेरीचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, शिक्षक पालक संघाचे आबासाहेब दैठणकर, स्वेरी संचलित इतर तिन्ही कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *