👁 8 Views

पंढरीतील ‘कृषी’ पंढरी कृषी महोत्सवाची तयारी पूर्ण…जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी केली पाहणी!

पंढरपूर LIVE 19 July 2018

*कृषी पंढरी महोत्सवाचा प्रचार यात्रेचे विविध ठिकाणी स्वागत,* 

पंढरपूर – आषाढी वारीच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समिती व शुअर शॉट इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी पंढरी या कृषी महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून वारीतील प्रमुख आकर्षण म्हणून या कृषी महोत्सवाकडे पहिले जात आहे. पंढरपूर शहरामध्ये विविध ठिकाणी कृषी पंढरी कृषी महोत्सवाचे फलक झळकत असून या कृषी महोत्सवाच्या प्रचारासाठी कृषी महोत्सवामध्ये सहभागी असणाऱ्या विविध विभाग व कंपन्यांची फेरी जिल्ह्यात विविध ठिकाणी काढण्यात आली, या यात्रेचे विविध ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. बाजार समितीचे सभापती दिलीप आप्पा घाडगे यांनी या प्रचार यात्रेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला यावेळी उपसभापती विवेक कचरे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उपस्थित होते. 

          या कृषी महोत्सवाच्या तयारीची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस प्रमुख वीरेश प्रभू यांनी केली तसेच भेट देणाऱ्या वारकरी व शेतकऱ्यांना गर्दीचा त्रास होणार नाही याबाबत सूचना केल्या.

यावर्षी या कृषी महोत्सवामध्ये आगर्वूड लागवड, खजूर शेती, मधमाशी पालन, शेळीपालन, रक्तचंदन लागवड, बांबू लागवड, मोत्यांची शेती अश्या नवनवीन कमी उत्पादन खर्च व जास्त उत्पन्न अशा पिकांची माहिती देणारे उद्योजक देखील निमंत्रित करण्यात आले आहेत.

हा कृषी महोत्सव दि.२१ ते २५ जुलै दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर होत असून यावेळी कृषी प्रदर्शनाबरोबरच कृषी औजारांच्या प्रात्यक्षिकांसाठी विशेष क्षेत्र, देशी गायींचे प्रदर्शन, लघुउद्योग क्षेत्रातील उद्योगांचे विशेष दालन व महिला बचत गटांचे विशेष दालन यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रदर्शनामध्ये ३०० पेक्षा जास्त स्टोल्स चा समावेश असून एकूण ७ एकर विस्तीर्ण क्षेत्रावर हे प्रदर्शन आयोजित केले जात आहे. यावर्षी प्रथमच देशी गायींचे प्रदर्शन देखील या प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहे.

शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनाकडे जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी यावर्षी १० रुपयांच्या कुपनमधून एका भाग्यवान विजेत्याला ट्रॅक्टर जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत असून महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने यावर्षी संवाद वारी या उपक्रमांतर्गत विशेष शासकीय दालन देखील उभारले जाणार आहे. या दालनामध्ये शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांची माहिती वारकरी व शेतकऱ्यांना मिळणार आहे अशी माहिती सभापती दिलीप आप्पा घाडगे व उपसभापती विवेक कचरे यांनी दिली.

पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *