👁 9 Views

श्री विठ्ठल अभियांत्रिकीचे प्रा.अनिल शिंदे यांना पी.एच.डी. प्राप्त

पंढरपूर LIVE 30 July 2018

पंढरपूर- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँन्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’च्या मेकॅनिकल  इंजिनिअरिंग विभागातील प्रा.अनिल भगवान शिंदे यांना नुकतीच सोलापूर  विद्यापीठाकडून अभियांत्रिकीमधील ‘हायड्रोडायनॅमिक अॅनालिसीस डिफ्रंट कॉन्फीग्रेशन ऑफ जरनल बेअरिंग अंडर वेरीअस ऑपरेटींग कंडीशन्स’ या विषयात पी.एच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी आपला शोध सोलापूर  विद्यापीठास सादर केला होता. त्यांच्या यशाबद्धल सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी पी.एचडी. प्राप्त केल्यामुळे महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.

         स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या प्रेरणेने, स्वेरीच्या संशोधन विभागचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या सहकार्याने पी.एचडी. पूर्ण केली आहे. त्यांना आई, वडील , भावंडे, पत्नी सौ. पल्लवी शिंदे  यांच्यासह स्वेरीच्या इतर प्राद्यापकांचेही बहुमोल सहकार्य लाभल्याचे डॉ. शिंदे यांनी आवर्जून सांगितले. पी.एच.डी. प्राप्त केल्याबद्धल स्वेरीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. ‘डॉ. शिंदे हे स्वेरीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात गेल्या ७ वर्षापासून उत्कृष्टपणे ज्ञानदान करत आहेत. ‘आविष्कार’ या संशोधन स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला होता. त्याचबरोबर सहा आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून शोध प्रबंध प्रकाशित झाली आहेत. यावेळी संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा यांच्यासह इतर स्वेरीचे पदाधिकारी व विश्वस्त, संस्थेंअंतर्गत असणाऱ्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस.डी. सोनवणे, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, यांच्यासह उपप्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी डॉ. शिंदे यांचे अभिनंदन केले.
  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *