👁 11 Views

पंढरपुर सिंहगड चे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांना सोलापूर विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार जाहीर! “आज सोलापुर विद्यापीठात होणार पुरस्कार वितरण सोहळा”

पंढरपूर LIVE 1 आॅगस्ट 2018


लक्ष्मी दहिवडी (प्रमोद बनसोडे) पंढरपूर सारख्या ग्रामीण भागात अल्पावधीतच अभियांत्रिकी शिक्षणात गुणवत्ता पुर्ण शिक्षण देऊन संपुर्ण जगात आपल्या पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षणाचा ठसा, विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा व उत्कृष्ट शिक्षणप्रणाली राबवून विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात यशस्वी पाऊल निर्माण करणारे कोर्टी (ता. पंढरपुर ) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांना सोलापुर विद्यापीठाकडून उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

         ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न करीत असलेले तसेच अभियांत्रिकी शिक्षणात स्वतःच्या कार्याचा दबदबा निर्माण करून प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी सोलापूर विद्यापीठात पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उत्कृष्ट कामगिरी करून विद्यार्थी व पालकांच्या विश्वासात पाञ राहुन ग्रामीण भागातील पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने उतुंग भरारी घेतली आहे.  काही दिसापुर्वी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅक परिषदेने ए ग्रेड मिळाला असुन सोलापूर जिल्ह्यात ए ग्रेड मिळविणारे पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी हे एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.

         सोलापूर विद्यापीठ सोलापुर यांच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यापीठाला संलग्न असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातुन उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार उद्या विद्यापीठाच्या वर्धापन दिनी दिनांक 1 ऑगस्ट रोजी 2018 रोजी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांना मान्यवरांच्या उपस्थित प्रदान करण्यात येणार आहे.
  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *