👁 6 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये डाॅ. राजकुमार देशमुख यांचे व्याख्यान संपन्न

पंढरपूर: प्रतिनिधी

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात “राष्ट्रीय प्रदुषण दिवसाचे” औचित्य साधून डाॅ. राजकुमार देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.

   महाविद्यालयाच्या वतीने डाॅ. राजकुमार देशमुख यांचे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

     यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डाॅ. देशमुख म्हणाले, १९८४ मध्ये भोपाळ वायू आपत्तीत मरण पावलेल्यांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय प्रदुषण दिवस साजरा केला जातो. त्याच दिवशी भोपाळमध्ये एम आय सी, मिथाइल आयसोसायनेट या घातक वायूच्या गळतीमुळे हजारो लोक मरण पावले होते. भोपाळ गॅस दुर्घटना ही इतिहासातील सर्वात घातक औद्योगिक प्रदूषण आपत्तींपैकी एक आहे. भविष्यात अशा घटना घडूच नये यासाठी भारत सरकार राष्ट्रीय प्रदुषण प्रतिबंधक दिन साजर करत आहे. 


भारतात राष्ट्रीय प्रदूषण प्रतिबंधक दिन साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अनावश्‍यक औद्योगिक आपत्ती टाळण्यासाठी उद्योगांच्या न्याय वापराबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे. मानवी निष्काळजीपणा आणि औद्योगिक उत्सर्जनामुळे होणारे पर्यावरणीय प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण कायद्यांचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस समर्पित असल्याचे मत डाॅ. राजकुमार देशमुख यांनी सिंहगड कॉलेज मध्ये बोलताना व्यक्त केले.


   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा. सोमनाथ कोळी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


वायू प्रदूषण, पाणी, माती, ध्वनी आणि इतर अनेक प्रकारच्या प्रदूषणांमुळे पर्यावरणाशी दीर्घकाळ तडजोड केली जात आहे. जागृत होऊन आपल्या ग्रहाचे सजीवांच्या अस्तित्वासाठी संरक्षण करणे ही काळाची गरज आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *