पंढरपूर LIVE 2 आॅगस्ट 2018
मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनास पंढरीत सुरुवात झाली असून आजच्या आंदोलनात भाळवणी जि.प. गटातील विविध गावकर्यांचा सहभाग होता. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज, गुरुवार पासून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी तालुक्यातील भाळवणी जिल्हा परिषद गटातील गावांचा सहभाग असून शेकडो आंदोलक तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या मारून बसले आहेत. दरम्यान पंढरपूर शहरातील मराठा कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मशाल रॅली काढून या आंदोलनास उपस्थिती दर्शवली.
पंढरीत सुरू असलेल्या सकल मराठा क्रांती मोर्च्या च्या आंदोलनास मुस्लीम बांधवांनी जाहीर पाठिंबा दिला
सकाळी १० वाजता आंदोलनास सुरुवात करताना मराठा आरक्षण आंदोलनावेळी बलिदान दिलेल्या सर्व समाज बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, जय जिजाऊ, जय शिवराय अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. आंदोलनादरम्यान भजन सुरू करण्यात आले असून यावेळी भाळवणी जिल्हा परषिद गटातील समाजातील ज्येष्ठ, युवक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आंदोलन स्थळी, तहसील कार्यालयाजवळ मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उद्या दि. ३ ऑगस्ट रोजी वाखरी जिल्हा परिषद गटातील सर्व गावांचा ठिय्या आंदोलनात सहभाग असणार आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनास पंढरीत सुरुवात झाली असून आजच्या आंदोलनात भाळवणी जि.प. गटातील विविध गावकर्यांचा सहभाग होता. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज, गुरुवार पासून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी तालुक्यातील भाळवणी जिल्हा परिषद गटातील गावांचा सहभाग असून शेकडो आंदोलक तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या मारून बसले आहेत. दरम्यान पंढरपूर शहरातील मराठा कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मशाल रॅली काढून या आंदोलनास उपस्थिती दर्शवली.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com