👁 9 Views

देशात स्त्री-पुरुष समानतेचा नुसताच गाजावाजा होतोय

पंढरपूर LIVE 4 आॅगस्ट  2018

पंढरपुर सिंहगड च्या विद्यार्थ्यांचा खंडाळी येथे पत नाट्यातुन स्त्री- पुरुष समानतेचा संदेश पंढरपुर (प्रतिनिधी) आपल्या देशात मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत दिवसेंदिवस घटताना दिसत आहे. असे लिहणारे व सांगणारे आज खूप जन आहेत यामध्ये सामाजिक संस्कुती आणि वैचारिक गोष्टी कारणीभूत आहेत. आज देशाच्या जडण- घडणीत स्त्रियांचा मोलाचा वाटा आहे आणि भविष्यात तो पुरुषांच्या बरोबरीचा हि असणार आहे. जर भविष्यात आपला देश उत्तम रित्या घडवायचा असेल तर मुली वाचायला हव्यात. त्यासाठी नुसताच गाजावाजा करून चालणार नाही तर याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे असे मत कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी खंडाळी (ता. मोहोळ) येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातील पत नाट्यातुन उपस्थित नागरिकांना संदेश दिला.

सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विशेष
श्रम संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये विद्यार्थांनी विविध
विषयातून प्रबोधन करताना म्हणाले, सामाजिक परिस्थिती आज खुप भयानक आहे.
ग्रामीण भागात आज ही मुलींची गर्भातच हत्या केली जाते मुलगा पाहिजे अशी
अपेक्षा समाज आज ठेवत असुन अशा समाजाची मानसिकता बदलण्यासाठी पंढरपुर
येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय
सेवा योजनेच्या माध्यमातून स्ञी भ्रृण हत्या हत्या थांबली पाहिजे तीला जन्माला
येऊ द्या आणि गावाच्या व समाजाच्या विकासासाठी तीला शिक्षण दिले पाहिजे.
सामाजिक प्रबोधन करून नागरिकांना स्ञी जन्माचे स्वागत करण्याचे आव्हान केले.
या दरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी झीरो बजेट शेती, सोशल मिडियाचा
अधिक होणार वापर टाळून तो वापर सामाजिक फोटो व समाजाच्या विकासासाठी
होणा-या पोस्ट सोशल मिडिया पाठविण्याचे आव्हान केले, स्ञी जीवनाची कल्पतरू
आहे तीला जन्माला येऊ द्या, हागणदारी मुक्त गाव, सेंद्रिय शेती करा रासायनिक
खताचा वापर टाळा, अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज, मुली वाचवा मुली शिकवा,


वृक्षारोपण, जलसंधारण काळाची गरज, शाश्वत शेती व सर्वागिण ग्रामीण विकास,
महिला सबलिकरण व सक्षमिकरण, स्वच्छ व उन्नत भारत अभियान आदी विषयावर
सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांना पतनाट्यातून संदेश दिला.
विशेष श्रम संस्कार शिबीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या
मार्गदर्शनाखाली खंडाळी (ता. मोहोळ) येथे २८ जुलै २०१८ ते ०४ ऑगस्ट २०१८
या कालावधीत संपन्न झाले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे
समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख सह राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभागी विद्यार्थ्यांनी
तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचा-यांनी परीश्रम घेतले.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *