👁 10 Views

आता फोनवरून वैद्यकीय सल्ला देणं बंद, आय.एम.ए.च्या सूचना

पंढरपूर LIVE 4 आॅगस्ट  2018

मे.मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता राज्यातल्या डॉक्टरांनी फोनवरून सल्ला देणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण अशा फोनवरून दिलेल्या सल्ल्याने कधी कधी रुग्णाचा जीव जाऊ शकतो आणि त्यामुळे डॉक्टरांचे संपूर्ण करिअर उद्ध्वस्त होऊ शकते. याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र विभागाने राज्यातल्या सर्व डॉक्टर्सना इशारा दिला आहे.

फोन वरून सल्ला दिल्याने रुग्णाच्या जिवावर बेतल्याचे प्रकरण मे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले होते. रत्नागिरीतल्या एका डॉक्टर दांपत्याला उपचारा दरम्यान हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्या याचिकेवर सुनावणी करताना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र विभागामार्फत राज्यातल्या सर्व डॉक्टर्सना परिपत्रक काढून मोबाईल वरून रुग्णाला सल्ला देणं बंद करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. मात्र एखाद्या वेळेस आणीबाणीच्या परिस्थितीत रुग्ण गंभीर असेल आणि त्याची संपूर्ण वैद्यकीय पार्श्वभूमी संबंधित डॉक्टरला माहिती असेल तरच फोनवरून सल्ला देण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे.फेब्रुवारी महिन्यात रत्नागिरीतल्या डॉक्टर दीपा पावसकर आणि डॉक्टर संदीप पावसकर यांच्या रुग्णालयात एका महिलेची प्रसुती होऊन तिला घरी सोडण्यात आले होते. मात्र घरी गेल्यानंतर तिची प्रकृती बिघडल्याचे तिच्या कुटुंबीयांनी डॉ. दीपा यांना फोन करून सांगितले. त्यावेळी डॉ. दीपा यांनी फोनवरूनच मेडिकल स्टोअर्समधून औषध घ्यायला सांगितलं होतं.डॉ दीपा यांनी सांगितलेले औषध घेतल्यानंतर महिलेची प्रकृती आणखीनच बिघडली. त्यामुळे पुन्हा डॉक्टरांना याबाबत माहिती देण्यात आली. तेव्हा डॉक्टरांनी तिला त्यांच्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेलं असता डॉक्टर दीपा किंवा डॉक्टर संदीप पावसकर हे दोघंही रुग्णालयात उपस्थित नव्हते. परिस्थिती गंभीर असल्यानंतरही पावसकर दांपत्य फोनवरूनच संबंधित महिलेवर उपचाराबाबत सल्ला देत राहिले. दुसऱ्या दिवशी मात्र या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी आणखीनच खालावल्याने तिला उपचारासाठी दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला.या प्रकरणी डॉक्टर दीपा पावसकर आणि डॉक्टर संदीप पावसकर या डॉक्टर दांपत्या विरोधात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे महाराष्ट्र विभागा मार्फत राज्यातल्या सर्व डॉक्टर्सना परिपत्रक काढून मोबाईलवरून रुग्णाला सल्ला देणं बंद करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *