👁 8 Views

आयुक्तालयाच्या हद्दीत कलम 37 (1)- कलम 37 (3) लागू

पंढरपूर LIVE 5 आॅगस्ट  2018


सोलापूर दि. 4 :- सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षा राखण्यासाठी दिनांक 3 ते 17 ऑगस्ट 2018 या कालावधीत पोलीस उपआयुक्त पोर्णिमा चौगले-श्रींगी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये आदेश लागू केले आहेत.
            या आदेशानुसार शस्त्रे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, काठ्या किंवा झेंडे असलेली काठी किंवा इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्रही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड अगर तत्सम शस्त्रे साठविणे अगर बाळगणे, सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, असभ्य हावभाव करणे, असभ्य भाषा वापरणे सभ्यता अगर नितीविरूध्द निरनिराळ्या जमातीच्या भावना दुखावल्या जातील व त्यामुळे त्यांच्यात भांडणे, बखेडे निर्माण होवून अशी सोंगे अगर चिन्ह अगर दस्तऐवज अगर जिन्नस तयार करून त्याचा प्रचारासाठी उपयोग करणे यास मनाई करण्यात आली आहे.
            सरकारी नोकरांना त्यांचे कर्तव्य व अधिकार बजावण्यासाठी उपनिर्दीष्ट वस्तु हाताळाव्या लागतात आणि ज्यांनी सक्षम पोलीस प्रधिकरणाची परवानगी घेतली आहे.अशा व्यक्तींना परवानगीतील अटीस पात्र राहून सदरचे आदेश लागू होणार नाहीत.
****** 
                                                      आयुक्तालयाच्या हद्दीत
कलम 37 (3) लागू
सोलापूर दि.4:- सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात सभा घेतले जाण्याची  वा मिरवणुका काढले जाण्याची शक्यता आहे आणि ज्या अर्थी जमाव / मिरवणुका यावर सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहणेसाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलीस उपआयुक्त पोर्णिमा चौगले-श्रींगी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये दिनांक 3 ते 17 ऑगस्ट 2018 या कालावधीत लागू केले आहेत.
या आदेशानुसार मिरवणुका काढण्यास वा सभा घेण्यास, 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.हा आदेश लग्न समारंभ, अंत्ययात्रा, मिरवणुका, मोर्चे, रॅली, आंदोलने, निवेदन, धरणे, सभा इत्यादींना सक्षम पोलीस प्राधिकरणाची परवानगी असेल त्यांना लागू राहणार नाही.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *