👁 10 Views

सकल मराठा क्रांती मोर्चा… पंढरीतील आंदोलनाला सर्व स्तरातून वाढला पाठींबा…. आंदोलनाची धार वाढली… आज झाले मानवी साखळी आंदोलन! 8 ऑगस्टला अ.भा.मराठा महासंघाचा गाढवी मोर्चा!

पंढरपूर LIVE 5 आॅगस्ट  2018

आरक्षणासाठी मराठा समाजाने सुरू केलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असुन आ. भारत भालके, आ.प्रशांत परिचारक, आ.बबनदादा शिंदे, चेअरमन कल्याणराव काळे, राष्ट्रवादीचे दिपकआबा पाटील यांच्यासह अनेक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी व राजकीय नेत्यांनी पंढरपूर येथील ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन या आंदोलनास आपला पाठिंबा दर्शविला आहे. एकुणच सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला दिवसेंदिवस अधिक धार चढताना आढळून येत आहे. आज दि. 5 ऑगस्ट रोजी ठिय्या आंदोलनाचा 4 था दिवस असून आज रोपळे जि.प. गणातील गावकरी व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांना बसण्यासाठी उभारलेल्या शामीयान्यामध्ये जागा अपुरी पडलेली आढळून येत असून अनेक आंदोलक उन्ह-पावसाची पर्वा न करता उघड्यावर बसून आंदोलनात सहभागी होताना दिसून आले.


आज पंढरपूरमध्ये मानवी साखळी आांदोलनही करण्यात आले. या आंदोलनात तरुणांसह मोठ्या संख्येने लहान मुलांनीही उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत तब्बल दीड कि.मी. ची मानवी साखळी करुन हे आंदोलन करण्यात आले. 



दरम्यान आज अ.भा. मराठा महासंघाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला पाठींबा असल्याचे सांगत बुधवार दि. 8 ऑगस्ट रोजी अ.भा. मराठा महासंघाच्या युवती व महिला सरकारच्या निषेधार्थ पंढरपूरमध्ये गाढवी मोर्चा काढणार असल्याचा इशारा अ.भा. मराठा महासंघाचे अर्जुन चव्हाण यांनी आज पत्रकारपरिषदेमध्ये दिला आहे.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *