👁 12 Views

पंढरपूर विरशैव लिंगायत समाजाच्या अध्यक्षपदी सलग चौथ्या वर्षी शिरीष पंतोजी पाटील

पंढरपूर LIVE 8 आॅगस्ट  2018

पंढरपूर – येथील नवीपेठमधील श्री.मन्मथ स्वामी मठामध्ये विरशैव लिंगायत समाजाच्या सन २०१८-१९ करीता नूतन पदाधिकाऱ्यांची निवड कार्यकारिणी लिंगायत समाजाचे आधारस्थंब समाजभूषण नंदकुमार (आप्पा) डोंबे यांच्या अध्यक्षतेखाली व लिंगायत समाजबांधवांच्या उपस्थितीत जाहीर झाली असून सलग चौथ्यांदा शिरीष पांडुरंग पंतोजी पाटील यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
          समाजभूषण नंदकुमार (आप्पा) डोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाठीमागील तीन वर्षाच्या कालावधीत लक्षवेधी कामगिरी करून समाजोपयोगी कार्यक्रमाची संपूर्ण धुरा सांभाळल्यामुळे सलग चौथ्या वर्षी देखील सर्वानुमते शिरीष पांडुरंग पंतोजी पाटील यांच्याकडेच अध्यक्षपद सोपविले तर इतर नूतन पदादिकारी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष-सुरज सुरेश पावले व अक्षय अनिल मेनकुदळे, कार्याध्यक्ष-विश्वनाथ उमाकांत कावळे, सचिव- गिरीश मधुकर हत्तीगोटे तर सदस्य म्हणून शंकर आप्पा पावले, संजय खटावकर, ज्ञानेश्वर सुकरे, बसवराज मरळे, रमेश पावले, अनिल शेटे, अनिल डोंबे, प्रशांत मेनकुदळे, नागेश सावळजकर, सोहम भिंगे, आकाश कावळे, ओम भिंगे यांची निवड करण्यात आली. यावेळी समाजभूषण नंदकुमार (आप्पा) डोंबे व समाजातील जेष्ठ मार्गदर्शकांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष शिरीष पंतोजी यांनी मागील वर्षाचा संपूर्ण लेखा-जोखा सादर करून नवीन वर्षातील कार्यक्रमांवर प्रकाश टाकला व अर्धवट बांधकाम व मंगलकार्यालय याविषयी चर्चा करून आज पर्यंतचा आढावा सादर केला. यावेळी काही नवीन प्रश्नावर विचार विनिमय करून निर्णय घेण्यात आले तर काहींची सांघीक चर्चा करून निर्णय घेतले जातील असेही सांगितले. ‘प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी माझे कार्य एकदम चोख राहील.’ असे आश्वासन अध्यक्ष शिरीष पंतोजी यांनी दिले यावेळी येत्या महिन्यात श्रावण मासानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमावर चर्चा झाली. यावेळी समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *