👁 8 Views

पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची पुजा व आरती जवान विक्रम राजाराम नाईकनवरे यांच्या शुभहस्ते

Pandharpur Live 18 September 2018


आज दि. 18 सप्टेंबर 2018 रोजी पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची पुजा व आरती आर्मी कमांडो नाईक विक्रम राजाराम नाईकनवरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी श्री. नाईकनवरे यांचे पिताश्री श्री.राजाराम महादेव नाईकनवरे व पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे आदी उपस्थित होते. पौरोहित्य श्री.भास्कर विप्र गुरुजी यांनी केले. श्री. नाईकनवरे हे पंढरीचे सुपूत्र असून ते भारतीय स्थल सेना (आर्मी) मध्ये आहेत. सध्या नॉर्थ सिक्कीम येथे देशाच्या सीमेचं संरक्षणार्थ ते कार्यरत आहेत. बर्‍याच वर्षानंतर त्यांना कांही दिवसाची सुट्टी मिळाल्याने आपल्या जन्मभुमीत म्हणजेच पंढरी नगरीत आले आहेत. ‘‘गेल्या 16 वर्षानंतर आज श्रीगणेशाच्या पुजेचा व आरतीचा योग आला. पंढरपूर लाईव्हच्या कार्यालयात श्रीगणेशाची आरती व पुजा करता आल्याने मला अतिशय आनंद झाला.’’ अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. पंढरपूर लाईव्हमुळे आम्हाला आपल्या पंढरीतील बातम्या तिकडे समजतात. अत्यंत प्रभावी माध्यम उपलब्ध केल्याबद्दल संपादक भगवान वानखेडे यांचं त्यांनी कौतुक केलं. 
सर्व भारतीय बंधु-भगिणींना व देशासाठी लढणार्‍या जवानांना उत्तम आरोग्य लाभावे व देशातील एकोपा व सर्वधर्मसमभाव टिकून रहावा. प्रत्येकाच्या मनात देशप्रेम भरुन राहिलेलं असावं. अशी मनोकामना यावेळी त्यांनी व्यक्त केली.  भगवान वानखेडे यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. व विनंतीला मान देऊन आवर्जुन उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. 

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *