👁 8 Views

तुकाराम भवनमध्ये महाप्रसादासाठी आलेल्या भाविकांची पादत्राणे जाताहेत चोरीला… मंदिर समितीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात… भाविकांमधून मागणी!

पंढरपूर LIVE 6 ऑक्टोबर 2018

पंढरपूर मध्ये तुकाराम भवन येथे भाविकांसाठी दररोज महाप्रसादाची सुविधा मंदिर समितीनं उपलब्ध केलेली आहे. परंतु येथे महाप्रसादासाठी आलेल्या भाविकांची पादत्राणे चोरीस जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यामुळे तुकाराम भवन येथे महाप्रसादासाठी आलेल्या भाविकांचं अर्ध ध्यान बाहेर सोडलेलं आपलं पादत्राण सुरक्षित आहे की नाही याकडं लागलेलं असतं. मंदिर समितीकडून यावर वेळीच योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी भाविकांमधून होत आहे.

  महाप्रसाद घेण्यासाठी अनेक भाविक तुकाराम भवन च्या बाहेर आपली पादत्राणे सोडतात.  महाप्रसाद घेऊन तृप्त झालेला भाविक जेंव्हा बाहेर येतो तेंव्हा आपली चप्पल अथवा बुट गायब झाल्याचे पाहून अवाक् होतो. देवाच्या दारात देवाचा प्रसाद भेटला याचं समाधान मनाच्या एका कोपर्‍यात साठवलेला भाविक “जाऊ दे गेली तर”.म्हणत नाराज मनानं नवीन पादत्राणे खरेदी करायला जातो. 

गेल्या काही वर्षांपासून चप्पलचोरांचा हा कारभार बिनबोभाट चाललेला असून यावर कोणीही काही बोलत नसल्याने हल्ली तुकाराम भवन, महाद्वार आदी मंदिर परिसरात पादत्राणे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आढळून येत आहे.
महाप्रसादासाठी गेल्यावर चप्पल चोरीला जाईल या भीतीमुळे अनेक भक्त महाप्रसादाचा लाभ घेणं टाळतात.

मंदिर समिती प्रशासनाकडून निदान तुकाराम भवनमध्ये महाप्रसाद घेण्यासाठी आलेल्या भाविकांची पादत्राणे सुरक्षीत ठेवण्यासाठी चप्पल स्टॅन्ड ची सोय करावी. येथे सीसीटीव्ही व सुरक्षा रक्षकाची सोय करावी. अशी मागणी भाविकांमधून होत आहे.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *