पंढरपूर LIVE 7 ऑक्टोबर 2018
चार वर्षांपूर्वी पंढरीची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पूर्णपणे शासनाने ताब्यात घेतल्यापासून मंदिरातील बडवे-उत्पात व सेवाधारी यांचे पुजा-अर्चा आदी नित्योपचार करण्याचे पिढीजात हक्क संपुष्टात आले होते. आपले हक्क हिरावून घेतल्याची वेदना अर्थातच बडवे-उत्पात आदी सेवाधारी मंडळींच्या मनास वेदना देणारे ठरले. किमान श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेचे पारंपरिक नित्योपचार व आमच्या पिढीजात परंपरा तरी आम्हाला करण्याचा अधिकार मिळावा. अशी मागणी बडवे-उत्पात मंडळींकडून होत होती. परंतु त्यांचे संपुर्ण हक्क संपुष्टात आल्याने शासननियुक्त समितीनं नेमलेले पगारी पुजारी देवाचे नित्योपचार करू लागले. याची खदखद मनात असलेल्या उत्पात मंडळींनी अखेर पुढचे पाऊल उचलले असून पंढरीत रुक्मिणीमातेचे दुसरे स्वतंत्र मंदिर उभारले आहे. या मंदिरात रुक्मिणी मातेच्या मूतीर्ची प्रतिष्ठापना ११ आॅक्टोबर (गुरुवारी) रोजी होणार आहे.
मंदिरातून बाहेर काढल्यानंतर अनेक वर्षापासून बडवे व उत्पात समाजाच्या मंदिरातील परंपरा करण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच मंदिर समितीकडून स्थानिकांना देवाला नैवेद्य दाखवण्यात देखील रोखले जाते जाते. तसेच काही जुन्या परंपरा खंडित करण्यात आले आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून समस्त उत्पात समाजाच्या वतीने काळा मारुती नजीक वसिष्ठ आश्रम येथे रुक्मिणी मातेचे मंदिर उभारले आहे.
येथील मूतीर्ची प्रतिष्ठापना नवरात्र मध्ये गुरुवारी अकरा रोजी करण्यात येणार आहे. या रुक्मिणी मंदिरात पूर्वीप्रमाणेच मंदिरातील सर्व नित्योपचार बाराही महिने सुरू करण्यात येणार आहेत. काकडा आरती नैवेद्य पोशाख धूपारती शेजारती याप्रमाणे राजोपचार पार पडणार आहे. मंदिरातील सर्व परंपरा पुन्हा सुरू करून त्याचे जतन व संवर्धन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







