
यंदा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचे वेळअमावस्या सणावर सावट दिसत होते. पण तरीही परंपरा म्हणून शेतकरी कुटुंबासह आपल्या शेतावर दाखल झाले व परंपरेप्रमाणे पांडव पूजा करून बाजरीचे उंडे, भाजी व पुरणपोळीचा आस्वाद घेतला. वेळअमावस्येला रब्बीच्या पिकांची पूजा केली जाते. शेतातील झाडाखाली चुना व काव यांच्या सहाय्याने दगडावर पांडवाची चित्रे काढून मोगा (मातीचे भांडे)वाहून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पूजा केली गेली.