काळ्या आईचे पूजन, हुरडा पार्टीने शिवार बहरले

Loading

पंढरपूर, मंगळवेढा,सांगोला, माळशिरसमध्ये पारंपरिक पद्धतीने साजरा झाला सण
पंढरपूर/मंगळवेढा/सांगोला : ‘धरणी आईची माया, कशी जाईल वाया’ या गीताप्रमाणे शेतकरी वर्षभर शेतामध्ये राब-राब राबून ज्या शेतावर वर्षभर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्या शेतीची पूजा शेतकरी वर्षातून येणार्‍या वेळअमावस्येदिवशी सहकुटुंब, सहपरिवार दिवसभर शेतात थांबून करतो. परंतु गतवर्षी पाऊसमान कमी असतानासुद्धा पुढील वर्षाच्या नवीन स्वप्नपूर्तीची आस मनात धरून शनिवारी दिवसभर पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा येथील शेतकरी राजा नवचैतन्याने आपल्या शेतात वावरताना दिसत होते.

शनिवारी सकाळपासून ज्वारीचे कोठार असलेल्या मंगळवेढय़ात वेळअमावस्येच्या निमित्ताने शेताचे व पिकाचे पूजन करत होते. वेळअमावस्येनिमित्त शासकीय कार्यालये., शाळांना सुट्टी असल्यामुळे परिसरातील नागरिक मित्रमंडळींसह हुरड्याचा व जेवणाचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी ज्वारीच्या शेतावर दिसत होते. त्यामुळे पूजेबरोबरच हुरड्यांच्या पाटर्य़ांमुळे मंगळवेढय़ातील अनेक शेत भरून गेले होते. 
पंढरपुरात आज तुंगत, मगरवाडी, सुस्ते, तारापूर, खरसोळी, फुलचिंचोली गावातील शेतकर्‍यानी शेतात जाऊन काळ्य़ा मातीची व पिकांचे पूजन केले. त्यानंतर काही ठिकाणी शेतातच स्वयंपाक करण्यात आला तर काहींनी घरून डबा भरून आणून शेतात जेवणाचा आनंद घेतला. जेवणात वाटाणा व तुरीचे दाणो घालून केलेली भाजी (भज्जी), तीळ गुळ, शेंगदाण्याची गोड पोळी, येळवणीची आमटी, ज्वारी व बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी, उंडे, धपाटे, भात व ताकास ज्वारीचे पीठ लावून केलेली आंबील व गव्हाची खीर अशा प्रकारच्या पदार्थांने जेवणाची गोडी आणखी वाढली. पंढरपुरात अस्सल गावरान जेवणाने अमावस्या साजरी
 ■ सांगोल्यात यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला. त्यानंतरही म्हणावा तसा पाऊस न झाल्याने रब्बी हंगामही दुष्काळाच्या सावटाखाली आला. शेतकर्‍यांनी झालेल्या पावसाच्या भरवशावर रब्बी हंगामातील ज्वारीच्या पेरण्या उरकून घेतल्या. काही भागात झालेल्या पावसाच्या मदतीने ज्वारीच्या पिकाची चांगली उगवण झाली तर काही भागात पाण्याअभावी ज्वारीच्या पिकाने कात टाकली. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे वेळाअमावस्येवर दुष्काळाचे सावट होते. परंपरेनुसार दुष्काळाच्या सावटाखाली साजरा करण्यात आला. 
शनिवारी शेतकर्‍यांनी ज्वारीचे पिकच शेतात नसल्यामुळे घरीच वेळअमावस्या साजरी केली. त्यामुळे पहिल्यांदाच खरीप पिकानंतर रब्बी पीक वाया गेल्यामुळे पाण्याअभावी जनावरांचा चारा., रोजगार आदी समस्या ग्रामीण भागात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे वेळअमावस्याही शेतकर्‍यांना आनंददायी न ठरता कही खुशी, कही गम, अशीच अवस्था निर्माण झाली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *