पंढरपूर लाईव्ह वृत्त(प्रतिनिधी) नुतन आमदार प्रशांत परिचारक यांचा सत्कार येथील नवी पेठ व्यापारी कमेटीच्या वतीने नुकताच करण्यात आला. यावेळी व्यापारी कमेटी चे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार प्रशांत परिचारक यांच्या मोठ्या मताधिक्याने झालेल्या विजयानंतर संपुर्ण सोलापूर जिल्ह्यातून परिचारक प्रेमी व परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विविध संस्था, संघटना यांचे वतीने त्यांच्या निवडीनिमित्त अभिनंदनपर सत्कार होत आहेत. नुकताच असाच सत्कार पंढरपूर येथील नवीपेठ व्यापारी कमेटीच्या वतीने झाला.
यावेळी कमेटीचे चेअरमन व पंढरपूर अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन दिपक शेटे, कमेटीचे अध्यक्ष पद्मकुमार (प्रिन्स) गांधी, उपाध्यक्ष संजय जवंजाळ, रजनीश कवठेकर, प्रकाशचंद गांधी, सोमनाथ डोंबे, भगिरथ म्हमाणे, सचिन म्हमाणे, संतोष चव्हाण, विलास गांधी, नितीन गांधी, आनंद चव्हाण, संतोष भिंगे, राजकुमार गांधी, राजेंद्र फडे, अनिल फडे, बालासाहेब बुरजे, श्री.कौलवार व सचिव इसाप्पा भिंगे आदी उपस्थित होते.