महाराष्ट्र शासनाने गर्भलिंग तपासणी व गर्भपात करणेस बंदी असताना दि 28/1/16 रोजी रात्रौ पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हदद्ीतील मौजे. अनवली ता पंढरपूर येथे काही डॉक्टर अवैद्यरित्या चोरून गर्भलिंग तपासणी करणे करीला अल्टोकारमधुन आलेले आहेत अशी गोपनीय बातमी मिळताच आम्ही पोलीस उपनिरीक्षक गोंधे, व पोलीस कर्मचारी यंाना बोलावुन घेवुन छापा टाकण्याचे नियोजन करून त्यांना घटनास्थळी रवाना केले.
पोलीस उपनिरीक्षक गोंधे व पोलीस कर्मचारी यंानी अनवली ता पंढरपूर येथे येताच एक अल्टो कार जात असलेचे दिसुन आलेने लागलीच त्यांनी सदरची अल्टो कारगाडी थांबवुन चौकशी सुरू केली तोच अंधाराचा फायदा घेत त्यांचेतील एक डॉक्टर तेथुन पळुन गेला अल्टो कारमधे असलेल्या इतर दोन डॉक्टर व अल्टो चालकास तीन गर्भवती महिला अल्टो कार क्र एम.एच.11 बी.व्ही.2873 सह पोसई गोंधे यंानी आमचे समक्ष हजर केलेने आम्ही यातील गर्भवती महिलांकडे विचारपुस केली असता ते तिघीजणी गर्भलिंग तपासणी व सोनोग्राफी करणे करीता आलेबाबत संागितले. तसेच त्यांचेसोबत अल्टो कारमध्ये असलेले 1) डॉ.हनुमंत ज्ञानेश्वर मोरे रा.कोळेगाव ता.माळशिरस 2) डॉ.तुाार पितांबर गाडे रा.म्हसवड ता.माण जि.सातारा व चालकाने त्याचे नाव संतोष किसन जाधव रा.खडकी ता.माण जि.सातारा असे असल्याचे सांगुन आम्ही कामानित्त अनवली येथे नातेवाईकांचे घरी आलेचे सांगितले. व कारमधुन पळुन गेलेल्या डॉक्टरचे नाव डॉ.हितेंद्र पाटील रा.विजापुर राज्य कर्नाटक असे असल्याचे आम्ही सदर अल्टो कारची तपासणी असता गाडीमध्ये एक लॅपटॉपची बॅग,त्यामध्ये एक लहान लॅपटॉप,चार्जर व सायोऔक्सी सॉप्ट जेल कॅप्सुल असे लिहलेले 6 पाकिटे तसेच इतर साहीत्य मिळाले आम्हाला सदर बाबत संशय आल्याने आम्ही सदर गाडी तसेच वरील तीन गर्भवती स्त्रीया व तीन इसमांकडे तोंडी चौकशी केली असता त्यांनी आम्ही सदर महिलांना याठिकाणी त्यांची गर्भलिंग निदान चाचणी करणेकरीता आणले असल्याचे सांगीतले.
तसेच आम्ही दोघे एजंट असुन आम्ही गर्भवती महिलांना संपर्क करुन आमचे ओळखीचे डॉ.हितेंद्र पाटील रा.विजापुर राज्य कर्नाटक यांना बोलावुन घेवुन त्यांचेकडुन गर्भवती महिलांची गर्भलिंग निदान चाचणी करित असल्याचे सदर प्रकरणी वरील गर्भावती महिलांकडे तसेच 1) डॉ.हनुमंत ज्ञानेश्वर मोरे रा.कोळेगाव ता.माळशिरस 2) डॉ.तुषार पितांबर गाडे रा.म्हसवड ता.माण जि.सातारा चालक संतोष किसन जाधव रा.खडकी ता.माण जि.सातारा यांस तसेच त्यांचेकडील मिळुन आलेले पांढरे रंगाची मारुती अल्टो गाडी एम.एच.11 बी.व्ही.2873 व गाडीमध्ये मिळुन आलेले एक लॅपटॉपची बॅग,त्यामध्ये एक लहान लॅपटॉप,चार्जर व सायोऔक्सी सॉप्ट जेल कॅप्सुल असे लिहलेले 6 पाकिटे असे सर्व साहीत्यांसह पी.सी.पी.एन.डी.टी.कायदा 2003 अनुसार ुढील कायदेशीर कारवाई होणेकरीता मा.वैद्यकीय अधिक्षक साो उपजिल्हा रूग्णालय, पंढरपूर यांची समक्ष भेट घेवुन ताब्यात घेतलेले इसम व गर्भवती स्त्रियां व लॅपटॉप व इतर साहित्य हजर करून कायदेशीर कारवाई होणेबाबतचे पत्र दिले.
त्यांनतर डॉ कोरूलकर, वैद्यकीय अधिक्षक पंढरपूर यांनी आम्ही दिलेले पत्र व सोबत हजर केलेले डॉक्टर व साक्षीदार यांचेकडे समक्ष चौकशी केली असता त्यामध्ये 1) डॉ.हनुमंत ज्ञानेश्वर मोरे रा.कोळेगाव ता.माळशिरस 2) डॉ.तुाार पितांबर गाडे रा.म्हसवड ता.माण जि.सातारा 3) डॉ हितेंद्र पाटील रा. विजापूर कनार्टक यांना सोनोग्राफी करण्याचा कोणताही अधिकार नसताना त्यंानी वरील साक्षीदार व इतर गर्भवती महिलांची सोनोग्राफी तपासणी करून त्यांचेकडुन 8 ते 10 हजार रू घेवुन त्यंाची फसवणुक केलेबाबत निपण झालेने त्यांनी दिलेले फिर्यादीवरून इकडील पोलीस ठाणे गुरन 355/15 भादवि 420,34 सह महाराट्र मेडिकल प्रॉक्टीशनर अॅक्टचे कलम 33 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
आम्ही गुन्हयाचे तपासकामी 1) डॉ.हनुमंत ज्ञानेश्वर मोरे रा.कोळेगाव ता.माळशिरस 2) डॉ.तुषार पितांबर गाडे रा.म्हसवड ता.माण जि.सातारा यांना दि 29/12/15 रोजी अटक केली असुन त्याची दि 4/1/16 रोजी पर्यत पो.क रिमांड मंजुर असुन त्यांचेकडे गुन्हयातील तिसरे डॉक्टर यांचे नावपत्ता व ठावठिकाण्या बाबत तपास केला असता त्याने पळुन गेलेल्या डॉक्टरचे नाव डॉ हितेंद्र पाटील रा. विजापूर कनार्टक असे असल्याचे सांगितलेने लागलीच आम्ही पोसई गोंधे व स्टाफ यांना तपासकामी विजापूर येथे रवाना केले. दरम्यान पोसई गोंधे
यांनी विजापूर येथे जावुन सदर पाहीजे असलेले डॉ हितेंद्र पाटील याचा ाोध घेतला पंरतु विजापूर येथे डॉ हितेंद्र पाटील या नावाचे कोणी डॉक्टर मिळुन आले नाही त्यामुळे अटक असलेले डॉक्टर पळुन गेलेल्या डॉक्टर विायी खोटे त्यानंतर आरोपी डॉ मोरे व डॉ गाडे यांचेकडे पळुन गेलेल्या डॉक्टरचे खरे नावाबाबत तपास केला तसेच डॉ.मोरे व डॉ गाडे यांचे मोबाईल कॉल डिटेल्स् प्राप्त करून घेवुन तपास केला असता सदर पळुन गेलेल्या आरोपीचे नाव विलास दिगंबर सावंत रा. म्हसवड ता माण जि सातारा असे असल्याचे समजलेने लागलीच आम्ही पोलीस पथकासह म्हसवड येथे जावुन आरोपीचा ाोध घेतला असता तो मिळुन आलेने आम्ही त्यास ताब्यात घेवुन चौकशीकामी पेालीस ठाणेस आनुन ज्या महिलांची
सोनोग्राफी केलेली आहे त्यांचे समक्ष हजर करून त्यांनी ओळखले नंतर त्यास नमुद गुन्हयास अटक करण्यात आली आहे.
दरम्यान यातील डॉक्टर आरोपी अ.क्र 1 ते 3 यांनी बेकायदेशीररित्या महिलांची सोनोग्राफी करून त्यांची लाखो रूपयाची फसवणुक करून जमवलेल्या रक्कमेतील रोख रक्कम 3 लाख रू डॉक्टरंाचे नातेवाईकांनी आमचे समक्ष हजर केलेने ती गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आलेली आहे. गुन्हयात वापरलेली अल्टो व बोलेरो वाहन जप्त करण्यात आलेली आहे. तपासा दरम्यान आरोपी अ.क्र 4 दत्तात्रय मारूती सुरवसे वय 37 रा. अनवली ता. पंढरपूर जि सोलापूर व आरोपी अ.क्र 5 तुकाराम बापू मोरे वय 47 रा. घर्णिगीं ता मंगळवेढा जि. सेालापूर यांचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने तपास केला असता ते यातील आरोपी अ.क्र 2 डॉ मोरे याचे नातेवाईक असुन त्यांनी बर्याचवेळा गर्भवती महिलांची सोनोग्राफी करणे करीता त्यंाचे घर आरोपी अ.क्र 1 ते 3 यांना उपलब्ध करून दिलेचे संागितलेने व गुन्हयात त्यांचा सहभाग असल्याचे तपासात निपण झालेने आम्ही यातील आरोपी अ.क्र 4 व 5 यंाना गुन्हयाचे तपासकामी अटक केली आहे. दरम्यान गुन्हा करणे करीता आरेापी डॉक्टरंानी वापरलेले प्रोप साक्षीदार संध्या तानाजी मोरे रा.खवणी ता.माहोळ यांचेकडे दिला होता तो प्रोप तिने त्याचे वडिल तानाजी विणु ोटे वय 45 रा. कोन्हेरी ता मोहोळ यांचेकडे दिलेचे व त्यांनी सदरचे प्रोप गुन्हयाचे तपासकामी पोलीसांकडे हजर न करता तो त्यांचे ोतातील 500 फुट बंद बोअरमध्ये टाकुन देवुन त्यावर माती घालुन गुन्हयाचा पुरावा नष्ट केल्याचे तपासात निष्पन्न झालेने नमुद गुन्हयास कलम 201 भादवि प्रमाणे वाढवुन त्यात आम्ही
यातील आरोपी तानाजी विणु ोटे वय 45 रा. कोन्हेरी ता मोहोळ यांना अटक केलेली आहे.
दरम्यान सौ संध्या तानाजी मोरे वय 25 र्वो धंदा घरकाम रा.खवणी ता.मोहोळ हिने सुमारे तीन महिन्यापुर्वी वरील तिन्ही डॉक्टरंाकडे गर्भलिंग तपासणी केलेनंतर गर्भामध्ये मुलीचे गर्भ असलेचे समजलेने तिने तिचे पतीसह मंगळवेढा येथील डॉ नाव विजय आप्पाराव सावंजी वय 59 रा. घर क्र 848, मेनरोड, मंगळवेढा जि.सोलापूर यांचेकडे स्त्री अभ्रकाचा गर्भपात केला
असल्याचे सांगितलेने आम्ही सदर गुन्हयामध्ये मेडिकल टरमेनिशन ऑफ प्रेग्नन्सी अॅक्ट सन 1971 चे कलम 4 व 5 ही कलमे वाढ करून आरोपी डॅा विजय आप्पाराव सावंजी रा. मंगळवेढा यंाना गुन्हयाचेकामी दि 8/1/16 रोजी अटक केली आहे.
सध्या सोनोग्राफी करणारे डॉ. हनुमंतराव ज्ञानेश्वर मोरे रा. कोळेगाव ता माळशिरस, डॉ तुाार पितांबर गाडे, डॉ विलास दिगंबर सावंत दोघे रा. म्हसवड ता माण जि सातारा व त्यांना मदत करणारे दत्तात्रय मारूती सुरवसे रा. अनवली ता पंढरपूर व तुमाराम बापू मोरे रा. घरनिकी ता मंगळवेढा हे न्यायालयीन कोठडीत असुन तानाजी विणु ोटे वय 45 रा.
कोन्हेरी ता मोहोळ हा सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे.
डॉ विजय आप्पाराव सावंजी रा. मंगळवेढा यांना आज रोजी गुन्हयाचे तपासात बर्याच गर्भवती महिलांनी वरील डॉक्टरंाकडे व इतर आणखी डॉक्टरांकडे गर्भलिंग तपासणी व सोनोग्राफी केली असल्याचे समजले असुन नागरीकांना विशेात: महिलांना आपण जर अशा प्रकार कोणत्याही डॉक्टरांकडुन गर्भलिंग तपासणी व सोनोग्राफी केली असल्यास त्याबाबतची माहीती पंढरपूर तालुका पोलीस ठाणेस दयावी. यामध्ये गर्भलिंग तपासणी व सोनोग्राफी करून घेतलेल्या गर्भवती महिलांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा होत नसुन ते गुन्हयातील
साक्षीदारच असतील असे आवाहन पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी केलेले आहे.
( दयानंद गावडे पोलीस निरीक्षक,पंढरपूर तालुका पेालीस स्टेशन)
कारवाईत सहभागी असलेले अधिकारी व कर्मचारी :-पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस उपनिरीक्षक राहुल गोंधे, पोहेकॉ/419 कदम, पोहेकॉ/1206 सांळुके, पोना/1322 हनीफ शेख, पोना/189 लवटे, पोना/1768 गवळी,पोना/1658 कोटी,पोना/1540 शिंदे,पोकॉ/276सावंजी