आरोप केलेच नाहीत, आपल्या अहवालातील आकडेच बोलतात!- पॅनलप्रमुख डॉ.बी.पी.रोंगे

Loading

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारार्थ षेतकरी सभासद व ग्रामस्थ यांना मार्गदर्षन करताना श्री विठ्ठल परिवर्तन व विकास पॅनलचे प्रमुख डॉ. बी. पी. रोंगे यांनी केले. 

पंढरपूर: ‘छत्रपती जन्माला आले पाहिजेत पण षेजारच्या घरात, सुभाश बोस जन्मले पाहिजे तेही त्याहून पलीकडच्या घरात ही मानसिकता बदलण्यासाठी, साखर कारखान्यातील दलदल साफ करण्यासाठी , आण्णा-दादांच्या काळचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी, पुर्वीप्रमाणेच ऊस दर देण्यासाठी, वेळेवर पगार करण्यासाठी, प्रत्येक वर्शी एक नंबरचा ऊसाचा दर कसा मिळेल यासाठी, मी प्रथम अहवाल मिळवून अभ्यास केला त्या अहवालातूनच षेतकरी व सभासदांची होणारी पिळवणूक व फसवणूक थांबविण्यासाठी मी प्रथम कारखान्याचा अभ्यास केला. अहवालातूनच समजले की त्यात प्रचंड स्वरूपात गलथान कारभार होत आहे. या भ्रश्ट कारभारानेच कारखान्याची दुर्दषा केली आणि ते म्हणतात ‘मी केलेले आरोप सिध्द करा.’ अहो, कारखान्याला अधोगती कषी प्राप्त झाली हे त्यांच्याच सही षिक्क्यासह अहवालातून समोर आले आहे. मग मला सांगा कारखान्याला फायदा झाला की तोटा?’ असे प्रतिपादन श्री विठ्ठल परिवर्तन व विकास पॅनलचे प्रमुख डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीच्या निमित्ताने षिरढोण व फुलचिंचोलीमध्ये पॅनल प्रमुख डॉ. बी. पी. रोंगे संवाद सभेत प्रस्थापितांच्या लबाड व दिषाभूल करणार्‍या वक्तव्याचे खरपूस समाचार घेत होते. प्रारंभी विद्यमान संचालक राजाराम सावंत यांनी ‘प्रस्थापित मंडळी भूल थापा, लबाड, दिषाभूल, भूलभूलैयाला सभासद मंडळी यंदा भिक घालणार नाही हे निदर्षनास आल्यावर ते काहीही वल्गना करून सभासदांची दिषाभूल करत सुटले आहेत. आता फक्त ‘नो भूलभूलैया ओनली रोंगे सर’ हेच धोरण सुज्ञ सभासद राबवित आहेत.’ असे स्पश्ट केले. स्वाभिमानी षेतकरी संंघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक भोस.ले यांनी सत्ताधार्‍यांना ‘कोण होतास तू, काय झालास तू?’ असे सवाल विचारत विरोधकांना अर्जुन बँंंक, सुत गिरणी व डेअरी हे कुठे गिळंकृत केले हे ठासून विचारले. यावेळी षिवसेना उपजिल्हा प्रमुख महावीर देषमुख, सचिन पाटील,  महेष पवार, रासपाचे बालाजी पाटील, पंकज देवकते, नाना खांडेकर यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांंंनी विठ्ठल कारखान्याची सद्य स्थितीचे दर्षन दिले. पुढे बोलताना  डॉ. रोंगे म्हणाले, ‘माझे वडील संस्थापक सभासद होते, माझे चुलते चिंतामणी रोंगे हे माजी संचालक होते. यामुळे साहजिकच वारसा हक्काने मीही सभासद झालेलो आहे आणि ते म्हणतात इतिहास माहित नाही. मी आता षेतकरी सभासदांचे भवितव्य ठरविण्यासाठीच रणांगनात उतरलेला आहे. ते म्हणतात एक तरी आरोप सिध्द करा, मी म्हणतोय, आरोप करतच नाही, वस्तुस्थिती मांडतोय तेही त्यांच्याच सहीषिक्का असलेल्या अहवालातून. आपणही दिषा भूल न करता एकतरी कागद दाखवा. षैक्षणिक संकुलामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्या पायावर उभे आहेत. आणि त्याची प्रगती मी सांगतच नाही. सारा महाराश्ट्र सांगतोय. पण आपण किती प्रगती केली हे दिसून येत आहे. सह वीज निर्मिती प्रकल्प, डिस्टेलरी, बायोकंपोस्ट खत आणि ऐनवेळी तोंडावर आलेली निवडणूक पाहून न झालेल्या विस्तारीकरणाचे उद्घाटनाचा देखावा करून दोन राश्ट्रीय नेत्यांबरोबरच चार माजी मुख्यमंत्री व नेतेमंडळींची फसवणूक केली हे आता मी सांगत नाही. संपूर्ण तालुक्याला माहीत झाले आहे. असे सांगून त्यांच्या दिषाभूल करणार्‍या कर्तृत्वाचा अहवालातून पंचनामा केला. यावेळी माजी संचालक बाळासाहेब पाटील,कै. औदुंबर आण्णांचे नातू अभिजित भैय्या पाटील, सौ. राजश्री पंडीत भोसले, पंजाबराव भोसले, डॉ. षिंदे, प्रचारप्रमुख काषिनाथ लवटे, विठ्ठल पाटील, नारायण मेटकरी, षषिकांत पाटील, विठ्ठल सपाटे, षांतीनाथ बागल, वैभव डोळे, कल्याण पाटील, रमाकांत पाटील, दत्ता तेली, रमाकांत पाटील, सुरेष माळी, दत्ता घोडके, भारत धारे, सुनिल षिंदे, मनोज गावंदरे यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पथनाटयाच्या माध्यमातून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची होत असलेल्या वाताहतीला वाचवून कारखान्याला गतवैभव कसे मिळेल यावर सादर केलेल्या पथनाटयाला ग्रामस्थ सभासदांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यामध्ये पूर्वीचे कश्टकरी मजुरांना आता होत असलेले हाल यावर सुंदर भाश्य करून रचनात्मक काव्य कावेरी पाटोळे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सादर केले. याला सर्वत्र प्रतिसाद मिळत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *