
या पुरस्कार सोहळ्यात अनेक विजेत्यांनी आपली सिने टीम, दिग्दर्शक, प्रोड्युसर यांचे आभार मानले. पण, दीपिकानं मात्र यावेळी आपल्या वडिलांनी – प्रकाश पादूकोण यांनी आपल्याला लिहिलेलं एक पत्र वाचून दाखवलं.
तू जे काही करतेय ते खरचं तुला आवडत असेल तर त्याशिवाय दुसरं काहीही महत्त्वाचं नाही…. अगदी अवॉर्डही नाही. तुझं मन काय सांगतंय पाहा आणि तुझी स्वप्न प्रत्यक्षात आण… तू पहिल्यांदा आमची मुलगी आहेस आणि नंतर एक अभिनेत्री’ असं या पत्रात प्रकाश पादूकोण यांनी आपल्या मुलीसाठी म्हटलं होतं.
दीपिकानं हे पत्र वाचून दाखवल्यानंतर सगळं वातावरण भारावलं होतं.