गेल्या काही दिवसांपासून ही माकडीण आपल्या स्वतःच्या पिल्लाप्रमाणे या कुत्र्याच्या पिल्लाची काळजी घेत आहे. दिवसभर त्याच्यासोबत खेळताना त्या पिल्लाला साधे खरचटणार नाही, इतकी काळजी ती घेते. स्थानिक नागरिकांसह कर्मचाऱ्यांना मायलेकरांच्या अनोख्या नात्याचं कौतुक वाटत आहे.
वाल्हे : आई आणि मुलाचं नातं जगात सर्वात मौल्यवान मानलं जातं. काही वेळा माय मरो, मावशी जगो अशी स्थिती निर्माण होते. असंच काहीसं माकडीण आणि कुत्र्याच्या पिल्लाबाबत पाहायला मिळालं आहे.
पुरंदर तहसील कार्यालयाच्या परिसरात एका माकडिणीने चक्क एका कुत्र्याच्या पिल्लाचं मातृत्व स्वीकारलं आहे. छत्र नसलेलं कुत्र्याचं पिल्लू या परिसरात आलं. कडाक्याच्या थंडीत त्या छोट्या जीवाचा आकांत माकडिणीला ऐकू आला आणि तिने त्या पिल्लाचं मातृत्व स्वीकारलं.